Homeक्राईममाळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी : बस चोरी उघडकीस, ७ लाखांचा मिनीबस हस्तगत...

माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी : बस चोरी उघडकीस, ७ लाखांचा मिनीबस हस्तगत संशयित चालकच निघाला चोर; पोलिसांच्या गस्तीमुळे यशस्वी कारवाई

माळेगाव दि . १ (प्रतिनिधी)  माळेगाव पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाने एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश करत ७ लाख रुपये किमतीचा मिनीबस हस्तगत केला आहे. या प्रकरणात आरोपी हा चोरीस गेलेल्या मिनीबसचा चालकच असल्याचे उघड झाले आहे.

माळेगाव परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी पोलीस दलाला विशेष गस्त घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले.

२८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १ ते ५ वाजण्याच्या सुमारास माळेगाव येथील राजहंस चौकातील शनी मंदिरासमोरून, बॅटरी दुकानाशेजारी उभी केलेली फोर्स मोटर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस चोरीला गेल्याची फिर्याद सचिन बाबासो कोकरे (रा. धुमाळवाडी, ता. बारामती) यांनी दिली होती. या मिनीबसची किंमत तब्बल ७ लाख रुपये आहे.

फिर्याद मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासणीदरम्यान बस चालक प्रदीप रामचंद्र शिंदे (रा. हावागज, ता. बारामती) याच्यावर संशय घेतला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

फोर्स मोटर्स कंपनीची पांढऱ्या रंगाची मिनीबस किंमत : ₹७,००,०००/- एकूण ७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, आरोपीविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन गु.र. नं. २२३/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राहुल पांढरे करत आहेत.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यामध्ये सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे तसेच अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे आणि अमोल वाघमारे यांचा सक्रिय सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!