Homeमहाराष्ट्रगुंठ्यात जमीन खरेदी विक्रीसाठी तुकडाबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी...

गुंठ्यात जमीन खरेदी विक्रीसाठी तुकडाबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत केली घोषणा

मुंबई (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि .11 शेती आणि जमीन खरेदी विक्री क्षेत्रातील दीर्घ काळापासूनचा डोकेदुखी ठरलेला 78 वर्षांपूर्वीचा तुकडाबंदी कायदा रद्द केला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत केली आहे. या कायद्याच्या बंदी नंतर शहरी भागात 1 गुंठा जमीन खरेदी आणि विक्री करण्याची मुभा ही मिळणार आहे. या निर्णयामुळे तब्बल 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे असे सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तुकडाबंदी कायदा बंदीकरणामुळे काय होणार बदल ?

78 वर्षांपूर्वी पारित झालेला तुकडाबंदी कायदा हा गुंठ्यात जमीन खरेदी विक्रीसाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या . या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे छोटे तुकडे विक्रीसाठी देणे कठीण झाले होते, ज्यामुळे शहरीकरणाच्या वाढत्या गरजांसाठी जमीन पुरवठा कमी होतो. आता हा तुकडा बंदी कायदा रद्द केल्यामुळे शहरी भागातील जमिनींचा लवकर आणि सुव्यवस्थित विक्री व्यवहार सुलभ होणार आहे.

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

या कायद्याच्या बंदी नंतर तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचे व्यवस्थापन आणि खरेदी विक्री करण्यासाठी नवीन दिशादर्शन ठरेल, अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याबरोबर, जमीन विक्री आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता व जलदगती येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला बळकटी मिळेल तसेच शहरी विकासाचा ही वेग वाढेल.

महसूल मंत्र्याची विधानसभेतील प्रतिक्रिया

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत सांगितले की, “तुकडाबंदी कायदा रद्द करून शहरी भागात 1 गुंठा जमीन खरेदी विक्री करण्याची मुभा शासन देत आहे. हा निर्णय शेतकरी वर्गाच्या हितासाठी असून त्यांच्या जमीन व्यवहारांना मार्गदर्शक ठरेल.” त्यांनी म्हटले की, “या निर्णयामुळे फक्त शेतकरी वर्ग नव्हे, तर संपूर्ण राज्याचा शहरीकरण आणि आर्थिक विकास गतीने पुढे जाईल.”

शेती आणि जमीन व्यवहारांसाठी दीर्घकाळापासून असलेली अडचण आता संपणार असल्याने शेतकरी वर्ग आणि शहरी जमीन व्यवहार क्षेत्रात मोठा बदल अपेक्षित आहे. गुंठ्यात जमीन खरेदी विक्रीसाठी तुकडाबंदी कायदा बंदीकरण हा ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत दिलेल्या याशिवाय निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि शहरी भागातील जमीन व्यवहार सुलभ होणार आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!