Homeराजकीयसर्वसामान्यांचे प्रश्न गावात सुटले पाहिजे मतदार संघाच्या विकासासाठी हिटलर जरी बनावे लागले...

सर्वसामान्यांचे प्रश्न गावात सुटले पाहिजे मतदार संघाच्या विकासासाठी हिटलर जरी बनावे लागले तरी चालेल – आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि .27
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गावात सुटले पाहिजे त्यासाठी तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने लोकाभिमुख कारभार करणे गरजेचे आहे.तेव्हा दलाल कमी होतील.व सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच जर्मनी च्या हिटलर चे उदाहरण देत मतदार संघाच्या विकासासाठी हिटलर जरी बनावे लागेल तरी हिटलर बनून मतदार संघाचा विकास साधेल असे प्रतिपादन चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी केले
दि.२७ जून २०२५ रोजी राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या वतीने आयोजित साकळी मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे साकळी ता.यावल येथे श्री भवानी माता मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आलेले होते.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांत अधिकारी बबन काकडे,यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड,तालुका कृषी अधिकारी बी.व्ही.वारे,यावल आरोग्य विस्तार अधिकारी डी. सि. पाटील, प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुकेश चौधरी यांच्या सह आरोग्य कर्मचारी,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, संचालक सूर्यभान पाटील,उज्जैनसिंग राजपूत,जेडीसीसी बँकेचे माजी संचालक गणेशदादा नेहेते, डांभूर्णीचे सरपंच पुरुजित चौधरी,शिरसाडचे माजी सरपंच गोटूउर्फ प्रविण सोनवणे,थोरगव्हणचे सरपंच समाधान सोनवणे,कोळन्हावीचे सरपंच गोटू सोळंके,भरत चौधरी सर,सुधाकर पाटील, प्रताप सोनवणे,मनवेलचे विनायक आप्पा पाटील,ग्रा.प.सदस्य विनोद खेवलकर,दिनकर माळी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रांतअधिकारी काकडे साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.यानंतर आ.चंद्रकांत सोनवणे यांचे सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर सुरुवातीला शासनाच्या मोफत शालेय साहित्य वाटप योजनेअंतर्गत आमदार सोनवणे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके,गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यानंतर उपस्थित महिला व पुरुष नागरिकांना विविध प्रकारचे दाखले,रेशन कार्ड,गोल्डन कार्ड , बेबीकिट,पशुखाद्य बियाणे तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखल्यांचे वाटप आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.एका वयोवृद्ध महिलेला तिला लागणारा सरकारी कागद देण्यासाठी आमदार सोनवणे चक्क व्यासपीठावरून खाली आले ही बाब व्यासपिठावरील मान्यवर तसेच उपस्थित सर्व नागरिकांना खूप भावली.
कार्यक्रमात आ.चंद्रकांत सोनवणे यांचे एकमेव मनोगत झाले.या मनोगत त्यांनी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना कोणत्या आहे.त्या सर्व योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.याविषयी सविस्तर सांगितले तसेच साकळी परिसरासह संपूर्ण यावल तालुका हा ‘डार्कझोन ‘मधून बाहेर काढण्यासाठी व पाणी पातळी वाढण्यासाठी जलसिंचन व पुनर्भरणाबाबत मी मागील पंधरा वर्षापासून प्रयत्नशील आहे.तशी मतदारसंघात कामे सुरू आहे.त्याचप्रमाणे पाणीपातळी वाढवण्यासाठी सर्वच नागरिकांनी सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले.
आ.सोनवणे पुढे म्हणाले की,सर्वसामान्य माणूस हा आपल्या कामासाठी पं.स.अथवा तहसीलदार कचेरी भोवती चकरा न मारता सर्वसामान्यांचे प्रश्न गावात सुटले पाहिजे.बँक अधिकारी,कर्मचारी यांनी सर्वसामान्य माणसाशी,शेतकऱ्यांशी व्यवस्थित बोललं पाहिजे व तशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेला द्याव्या.माझ्या प्रयत्नातून महसूल प्रशासनाकडून ७/१२ उताऱ्यावर हयात नावे लावली गेली.मयत खातेदारांची नावे कमी केली जुन्या योजनांच्या नोंदी कमी केल्या पोट खराब ही नोंद काढून तो भाग वहिवाटीसाठी करण्यासाठीच्या सूचना मी महसूल अधिकाऱ्यांना दिलेले आहे.एखाद्याला आवश्यक असणारा शासकीय दाखला वेळोवेळी दिला तर लाभार्थ्यांचे आयुष्य सुधारते. हे लक्षात घेऊन तालुक्यातील संपूर्ण प्रशासनाने तत्परतेने सर्वसामान्यांची कामे करणे गरजेचे आहे.रेशनिंग विभागात धनदांडग्यांना धान्य मिळते व गरजूंना मिळत नाही याबाबत संबंधित पुरवठा विभागाने सखोल चौकशी करून खऱ्या लाभार्थ्याला धन्याचा लाभ मिळवून द्यावा.घरकुलापासून कोणीही वंचित राहता कामा नये त्यासाठी रमाई ,शबरी तसेच प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणे महत्त्वाचे आहे.महिला- भगिनींनी आपले आरोग्य सांभाळण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे असून आपले आरोग्य सांभाळावे.तसेच शेतकऱ्यांनी शासनच्या ‘जलतारा ‘ योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतात पाणी जिरवले पाहिजे.शेतीची काळजी घेतली पाहिजे.तिचे आरोग्य सांभाळले पाहिजे.त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या अनेक योजना असून मागील त्याला योजना असे या विभागाचे तत्व आहे.
अलीकडच्या काळात माजी आमदार सौ.लताताई सोनवणे व माझ्या प्रयत्नातून तसेच राज्य सरकारच्या व सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून सुमारे ७५० कोटींची जल उपसा सिंचन योजना लवकरच कार्यानित होणार असून मतदार संघातील काही गावांसह साकळी सह परिसरातील काही गावांतील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.पाण्याचा थेंब थेंब आपल्या सर्वांना वाचवायचा असून पुनर्भरणाच्याया माध्यमातून पाणी जमिनीत जिरले पाहिजे यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. असे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शेवटी सांगितले.
मनोगतानंतर आ.सोनवणे यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी संबंधित प्रशासनाला तात्काळ आदेश दिले.त्यामुळे उपस्थित नागरिकांना उपक्रम आवडला.या अभियानादरम्यान प्रशासनाच्या विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आलेले होते.व या ठिकाणी संबंधित अधिकारी – कर्मचारी हजर होते.त्यांनी संबंधित नागरिकांच्या प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या अडीअडचणी त्या समजून घेऊन शक्य तेवढ्या तात्काळ सोडवण्याच्या प्रयत्न केला.या कार्यक्रमासाठी साकळी मंडळ अंतर्गत साकळीसह जवळपास तेरा गावातील महिला- भगिनी, नागरिक,ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी केले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साकळी चे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साकळीचे ग्राम महसूल अधिकारी संजीव दंडगोळे,मनवेलचे ग्राम महसूल अधिकारी विजय पाटील,किनगाव (खुर्द) चे ग्राम महसूल अधिकारी अमित राऊत,किनगाव(बु.) ग्राम महसूल अधिकारी मधुकर खुर्दा,नायगावच्या ग्राम महसूल अधिकारी छाया झटके,मनीषा बारेला,महसूल सेवक गणेश वराडे,गणेश महाजन,विशाल राजपूत,रुपेश कोळी,विजय भालेराव,ज्ञानदेव साळूंके, समीर तडवी,तृषार ठोसरे यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!