Homeशिक्षण-प्रशिक्षणवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त... जैन कुटुंबीयांकडून साकळीच्या जि.प. मुलींच्या शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप.

वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त… जैन कुटुंबीयांकडून साकळीच्या जि.प. मुलींच्या शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप.

यावल तालुका प्रतिनिधी (मिलिंद जंजाळे ) दि .12 यावल तालुक्यातील साकळी येथील सेवानिवृत माध्य.शिक्षक स्व.यशवंतलालजी रामलालजी जैन यांच्या ५ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि.१० जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा,साकळी या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना स्व.जैन सर यांच्या पत्नी श्रीमती मंदाबाई जैन व मुलगा पंकज जैन व परिवाराकडून स्वखर्चातून अंकलिपी, नोटबुक आणि लेखन साहित्य अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची भेट स्वरुपात वितरण केले.जैन कुटुंबीय दर वर्षी स्व.यशवंतलालजी जैन सर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त स्वखर्चातून वेगवेगळ्या प्रकारचे समाजोपयोगी कार्य करून वडिलांना भावपूर्ण आदरांजली वाहत असतात.यंदाच्या पुण्यस्मरणानिमित्त शाळेसाठी काय करता येईल ? याविषयी शिक्षक सचिन ढालपे सर यांच्याशी चर्चा केली असता शाळेतील बऱ्याच मुलींजवळ नोटबुक,अंकलिपी नाही तर काही जणांजवळ शैक्षणिक साहित्य सुद्धा नाही असे लक्षात आले.त्यामुळे या विद्यार्थिनींच्या शिक्षण प्रक्रियेत अडचण येत होती. ही शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची उणीव लक्षात घेऊनच शाळेतील इयत्ता १ ते ४ च्या सर्व विद्यार्थीनींना सदरचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.सदर उपक्रमातून कौतुकास्पद अशी दातृत्वाची भावना दिसून आली.
या प्रसंगी माजी ग्रा.पं.सदस्य साहेबराव बडगुजर ग्रा.पं.सदस्य परमानंद बडगुजर, मुलांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौरभ जैन (सर),पत्रकार चंद्रकांत नेवे,पालक आशिष नेवे, हिरालाल सोनवणे, सौ.भारती जैन, मुलींची शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ.शोभा जैन,सौ.प्रियंका जैन,मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम तसेच सर्व शिक्षक -शिक्षिका वृंद तसेच विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!