Homeशिक्षण-प्रशिक्षणरावेर तालुक्यातील पाल येथे पाचवे पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन..

रावेर तालुक्यातील पाल येथे पाचवे पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन..

रावेर दि . 29 प्रतिनिधी ( विनायक जहुरे )  दि . 27 डिसेंबर  शनिवारी रोजी रावेर तालुक्यातील पाल येथे सकाळी 10 वा.चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्या पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले.

वनप्रशिक्षण केंद्राच्या वास्तूत सलीम अली सभागृहात, मारुती चितमपल्ली व्यासपीठावर पूर्व माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाध्यक्ष डॉ. विनोद भागवत, वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंत शेवाळे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करून, आयोजक चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.
त्याचबरोबर आपल्या प्रास्ताविकात या संमेलनाचे आयोजक यांनी संस्थेने जाणीवपूर्वक पाल येथे घेतल्याचे कारण विषद केले. तसेच उद्घाटक शेवाळे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात वनक्षेत्र प्रशिक्षणाच्या वतीने आयोजित संमेलनाचे महत्व आणि उपयुक्तता सांगितली. मा.आमदार शिरीष दादा चौधरी यांनी निसर्गाच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांच्या कार्याचे कौतुक करून केव्हाही सहकार्य करण्याची तयारी दाखवली. संमेलनाचे अध्यक्ष डॉ.विनोद भागवत यांनी पक्षी निरीक्षण, वनराई संवर्धनाच्या कामात सातत्य ठेवण्याचे आवाहन करून होणारा कोणताही विरोध किंवा अडचणी ,निराश न होता संघटितपणे संवाद साधून सर्वांनी पुढे जाण्याची तयारी ठेवावी यश येतेच असा विश्वास व्यक्त केला.

या संमेलनात अनेक शोध कार्याची माहिती, निरीक्षणे, नोंदी… अशा उपक्रमांमधून उपस्थित लोकांचे नैसर्गिक, पर्यावरणीय उद्बोधन होणार असे संमेलनाच्या आयोजन समितीच्या सूत्रांकडून कळते. वनविभाग आणि चातक निसर्ग संवर्धन संस्था वरणगाव तसेच अन्य अशासकीय संस्थांच्या निसर्गप्रेमी व्यक्तींच्या सहभागातून संपन्न होत असलेले हे संमेलन जनतेत निसर्ग, पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात मौलिक जागृती निर्माण करेल असे अनेकांच्या अभिप्रायातून व्यक्त झाले.यावेळी राज्यभरातून 150 अभ्यासक उपस्थित होते.
याप्रसंगी पक्षी अभ्यासक अनिल महाजन, मा. आमदार
शिरीष दादा चौधरी , संमेलन अध्यक्ष डॉ विनोद भागवत ,हेमंत शेवाळे, संचालक दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था. डॉ महेश महाजन,वनपरीक्षेत्र अधिकारी शितल नगराळे आदी प्रमुख उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!