Homeआरोग्यमुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीच्या कार्याची दखल घेत श्री सर्व समाज विशाल गणेश मंडळांनी...

मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीच्या कार्याची दखल घेत श्री सर्व समाज विशाल गणेश मंडळांनी केला विशेष सत्कार

मुक्ताईनगर दि . 7 (प्रतिनिधी ) मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीच्या स्वच्छता व समाजकल्याणकारी कार्याची दखल घेत श्री सर्व समाज विशाल गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाचा फोटो देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रुपेश सोनार, उपाध्यक्ष अनिकेत तळेले, तसेच जेष्ठ कार्यकर्ते अशोक जी बोराखेडे, नितीन जैन, अतुल जावरे, नरेंद्र सापधरे सर, योगेश मनसुटे व इतर ग्रामस्थ, महिला वर्ग आणि बालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या सहकार्याच्या कार्यक्रमात निर्माल्य स्वच्छतेसाठी 20 ट्रॉलीचा वापर करण्यात आला. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत हा स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणावर राबविण्यात आला. या मोहिमेत 41 सिव्हिल सोसायटी सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून एकात्मतेची उत्कृष्ट झलक दिली.

श्री सर्व समाज विशाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नदीचे पवित्र पात्र स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वावर विशेष भर दिला. विविध ठिकाणी बॅनर आणि साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून गणेश भक्तांना नदीची स्वच्छता राखण्यासाठी नम्र विनंती करण्यात आली. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये पर्यावरणजागृती वाढीस लागल्याचे दिसून आले.

मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीच्या सामाजिक कार्याची महती

मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीने स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. यामुळेच स्थानिक समाजातून त्यांना विशेष मान्यता मिळाली आहे. गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारच्या स्वच्छता अभियानांनी उत्सवाची धार्मिकता वाढवली असून, या उपक्रमातून भक्तांची जबाबदारीही अधोरेखित झाली आहे.

श्री सर्व समाज विशाल गणेश मंडळ आणि मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी यांच्या सामूहिक प्रयत्नांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा अनुभव अधिक सुंदर आणि पर्यावरणपू्र्ण बनला आहे. सामाजिक समजुतीसाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अशा सहकार्यांच्या उपक्रमांना पुढील काळातही चालना देण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!