Homeआरोग्यरसलपुर येथे ग्रामपंचायत सदस्यांच्या घरासमोर साचले सांडपाणी ; रविंद्र तायडे यांची खंत...

रसलपुर येथे ग्रामपंचायत सदस्यांच्या घरासमोर साचले सांडपाणी ; रविंद्र तायडे यांची खंत…

रावेर दि .17 (प्रतिनिधी )रावेर तालुक्यातील रसलपुर येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या घरासमोर सांडपाणी साचले असून या समस्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे प्रकरण ग्रामपंचायत कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. विशेषतः अनुसुचित जातीच्या राखीव प्रभागातून बिनविरोध निवडणूक जिंकलेले सदस्य रविंद्र जगन्नाथ तायडे या गंभीर समस्येबाबत खंत व्यक्त करत आहेत.

रसलपुर येथील रविंद्र तायडे यांच्या घरासमोर फेवर ब्लॉक बसविलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे. हे सांडपाणी अनेक दिवसांपासून तिथे साचलेले असून यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याची समस्या निर्माण होत आहेत. रविंद्र तायडे यांनी म्हटले, “मी ग्रामपंचायत सदस्य असून ही माझ्या घरापुढे घडणाऱ्या या समस्येची ग्रामपंचायत पाहणी करत नाही. जर माझ्या सारख्या सदस्याची किंवा त्याच्या घरासमोरची समस्या दुर्लक्ष केली जात असेल तर सामान्य नागरिकांसाठी परिस्थिती किती बिकट असेल याचा विचार करावा लागेल.

या प्रकरणामुळे ग्रामपंचायतच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य केवळ नावासाठी आहेत की काय? अशी नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. सरपंचांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आणि असंतोष वाढत चालला आहे.

सांडपाणी साचल्यामुळे होणारे परिणाम

सांडपाणी साचल्यामुळे परिसरात डास, मच्छरांचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच सांड पाण्याच्या दुर्गंधीमुळे राहणी मानावर ही वाईट परिणाम होत आहे. या समस्येवर त्वरित ग्रामपंचायतने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

नागरिकांची अपेक्षा

रसलपुर ग्रामपंचायतने या समस्येवर त्वरित तोडगा काढावा आणि सांडपाणी काढण्यासाठी व्यापक स्वच्छता मोहिम राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच स्थानिक प्रशासन आणि सरपंच यांना अधिक सक्रिय होऊन समस्या सोडवण्यावर भर द्यावा असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

रसलपुर येथील सांडपाणी साचण्याचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य रविंद्र तायडे यांनी स्पष्टपणे उचल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाला मोठा फटका बसला आहे. एका सदस्याच्या घरासमोरचा प्रश्न सोडवण्यात ही ग्रामपंचायत निष्क्रिय राहिल्यास सामान्य नागरिकांची व्यथा काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ग्रामपंचायतने त्वरित उपाय योजना करुन लोकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!