Homeसामाजिकभीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची जळगाव जिल्हा कार्यकारणी निवडी संदर्भात बैठक

भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची जळगाव जिल्हा कार्यकारणी निवडी संदर्भात बैठक

जळगाव (प्रतिनिधी ) दि . 8 जून रोजी जळगाव जिल्हा कार्यकारणी निवडी संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हा अध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या अध्यक्षतेखाली “पद्मालय” शासकिय विश्राम गृह, जळगांव येथे सकाळी १०:०० वाजता होणार आहे.

बैठकीत आंबेडकरी चळवळीत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्य करण्यात इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले गेले आहे.

या बैठकीत भीमा कोरेगाव जयस्तंभाच्या जागेवर अतिक्रमणाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पाठिंब्यासाठी चर्चा होणार आहे. याबरोबरच, या हक्काची लढाई गाव स्तरावर पोहचविणे, जिल्हा कार्यकारणीची निवड करणे, व तालुक्यातील जवाबदारी वाटून देण्यावरही विचार विनिमय होईल.

सरकारने भिमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी निधीची अनेक वेळा घोषणा केली आहे; परंतु अतिक्रमण व जागेच्या मालकीच्या हक्कासाठी चालू असलेला न्यायालयीन खटला प्रगतीत असल्याने, विकास कार्य ठप्प झाले आहेत. म्हणून न्यायालयाचा खटला जिंकणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी ठरली आहे.

या अतिक्रमणाच्या विरोधातील लढ्यात जनजागृती करण्यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्यासह, जिल्हा अध्यक्ष प्रकाश सरदार देखील या ऐतिहासिक लढ्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.

बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करताना बाबुराव वाघ यांनी सर्व गोष्टी ध्यानात घ्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सांगितले आहे.

या लढ्यात प्रत्येकाने सहभागी व्हण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून न्यायालयीन खटला जलद गतीने होईल आणि लवकर निकाल लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!