Homeताज्या बातम्याकृषिमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्त आ.अमोल जावळे यांच्या पुढाकारातून विवरे–अजंदे रस्त्याचे...

कृषिमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्त आ.अमोल जावळे यांच्या पुढाकारातून विवरे–अजंदे रस्त्याचे भूमिपूजन

रावेर दि . 3 ( प्रतिनिधी )  दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विवरे–अजंदे या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन कृषिमित्र स्व. हरीभाऊ जावळे यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे.

गेल्या २५ वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतमाल वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या विकासकामामुळे परिसरातील जनजीवन सुलभ होणार असून हा रस्ता ग्रामस्थांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. विवरे व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना या मार्गाने थेट रेल्वे स्टेशनपर्यंत जाणे सोयीचे होणार आहे. विशेषतः केळी वाहतुकीसाठी या रस्त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

या प्रसंगी आमदार अमोल जावळे म्हणाले, “बाबांच्या काळापासून या रस्त्याची मागणी सुरू होती, परंतु काही कारणास्तव हे काम पूर्ण होऊ शकले नाही. परंतु मला आनंद आहे की निवडून आल्याच्या केवळ सहा महिन्यांत मी या रस्त्याचे भूमिपूजन करू शकलो. आपण मला भरभरून मतदान केले आहे, त्यामुळे या मतदारसंघाचा कायापालट करणे ही माझी जबाबदारी आहे. मागील पाच वर्षांत विकासकामे थांबली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुशेष राहिला आहे. मात्र, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा अनुशेष आम्ही नक्कीच भरून काढू.”

या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थ, महिला, युवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश धनके, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, अरुण शिंदे, विजय महाजन, दुर्गादास पाटील, राजन लासूरकर, रंजनाताई पाटील, हेमराज लासुरे, पी. के. महाजन, वासू नरवडे, सी. एस. पाटील, हरलाल कोळी, जुम्मा तडवी, दुर्गेश पाटील, सूर्यकांत पाटील, रवी पाटील, प्रविण पाचपोहे, संदीप पाटील, गोंडू महाजन, शीतल पाटील, चेतन पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!