Homeताज्या बातम्याउपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक !

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक !

हैदराबाद दि .23 ( लक्षवेध न्युज नेटवर्क )  एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला अफाट माया… तेलंगणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डी यांच्या घरावर टाकलेल्या धाडीने संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली आहे. छाप्यात समोर आलेले दृश्य पाहून खुद्द तपास अधिकारीही चक्रावून गेले. रेड्डी यांच्याकडे तब्बल ८ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.

बुधवारी सकाळी एसीबीच्या विशेष पथकाने हनुमाकोंडा येथील उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या एकूण ८ ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये हैदराबादमधील पॉश रॉकी टाऊन कॉलनीचाही समावेश होता.

तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तेचा आकडा मोठा आहेः

रोख रक्कमः ३० लाख रुपये रोख.

– स्थावर मालमत्ताः ६ कोटी रुपये किमतीचा एक आलिशान विला आणि फार्महाऊस.

– दागिनेः मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू.

आतापर्यंत ८ कोटी ३० लाखांहून अधिक मालमत्तेचा खुलासा झाला असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

रेड्डी यांनी २००८ सालापासूनच अवैध संपत्ती जमवण्यास सुरुवात केली होती. २०१६-१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात त्यांनी डल्ला मारल्याचा आरोप आहे. तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी असताना १ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी त्यांना अटक झाली होती, त्यानंतर त्यांना सेवेतन बडतर्फ करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!