Homeमहाराष्ट्ररावेर पंचायत समिती तालुका स्तरावर बदली आणि प्रभारी नेमणुकीवर शिक्का; ग्रामसेवकांची तीव्र...

रावेर पंचायत समिती तालुका स्तरावर बदली आणि प्रभारी नेमणुकीवर शिक्का; ग्रामसेवकांची तीव्र नाराजी

रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि . 1 रावेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या प्रशासकीय बदलीमुळे स्थानिक शासन व्यवस्थेत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ग्रामसेवकांच्या बदली प्रकरणात दिसणारा विरोधाभास आणि मनमानी कारभार यामुळे तालुका स्तरावर प्रशासना विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काही ग्रामसेवकांकडे केवळ एकच गाव आहे, तर काहींना तीन गावांचा पदभार सोपवला जाणे या विषयावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सतत सात ते आठ वर्ष एखाद्या गावात सेवा देणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदलीसाठी विनंती अर्जानंतर प्रशासनाने त्यांची बदली केली अथवा केली गेली, मात्र नवीन बदली होई पर्यंत तात्पुरती प्रभारी नेमणूक करणे कोणत्या कारणावरून योग्य समजले जाते ? यामुळे ग्रामपंचायत विभागात मनमानी कारभाराच्या विरोधास आरोप उठत आहे.

रावेर पंचायत समितीत ग्रामसेवकांचे सामाजिक आणि प्रशासकीय हित सांभाळताना उद्भवलेली अशी परिस्थिति तालुका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. प्रशासकीय बदली मिळालेल्या ग्रामसेवकांना त्वरीत स्थायी गाव देण्यात यावे, तसेच दोनदा प्रभारी नेमणूक करण्याची पद्धत थांबवावी अशी मागणी तालुका ग्रामीण भागातील आणि स्थानिक नागरीकां कडून मागणी होत आहे.

या वादग्रस्त बाबीमुळे पंचायत समितीच्या कामकाजावर ही परिणाम होत असल्याने स्थानिक प्रशासनाने अधिक पारदर्शक आणि न्याय्य बदली धोरण राबवणे आवश्यक आहे. ग्रामसेवकांचे भविष्य आणि गावातील विकास यासाठी सुसंगत आणि योग्य नेमणुकीवर भर देणे हेच काळाची गरज बनली आहे.

रावेर पंचायत समितीतील ग्रामसेवकांच्या बदली प्रक्रिया आणि प्रभारी नेमणुकीतील विरोधाभास प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरले आहेत. प्रशासनाने ग्रामसेवकांना योग्य ती गावे त्वरीत बदलून दिली पाहिजे आणि मनमानी कारभार पूर्णपणे थांबवून एक स्पष्ट, पारदर्शक आणि सामंजस्यपूर्ण धोरण अमलात आणले पाहिजे. यामुळे स्थानिक प्रशासनाची विश्वासार्हता वाढेल आणि ग्रामपंचायत विभागात शिस्त व सुव्यवस्था प्रस्थापित होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!