यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि . 27
यावल तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस ची तालुका अध्यक्षासह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची जिल्हा काँग्रेस कमिटी कडुन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावल तालुक्यात काँगेस पक्षाची ताकत वाढविण्यासाठी व पक्ष मजबूत करण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रांता अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने यावल ग्रामीण ब्लॉक तालुका कार्यकारणी करण्याच्या उद्देशाने माजी आमदार रमेश चौधरी व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासोबत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन काँगेस पक्षात मनापासुन काम करणाऱ्या व काँगेस पक्ष यावल तालुक्यात वाढविण्यासाठी यावल तालुक्यात घरा घरात काँग्रेस पक्षाचे महत्व पटून देण्याच्या दृष्टीने यावल तालुका कार्यकारणी जाहीर व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन नवनियुक्त यावल तालुक्यातील काँगेस पदाधिकारी पुढील प्रमाणे यावल तालुका काँगेस कमिटी यावल तालुका अध्यक्ष सावखेडा सिम येथिल शेखर सोपान पाटील यांची निवड करण्यात आली असुन साकळी येथिल प्रगतशील शेतकरी नेहमी काँगेस पक्षात एकनिष्ठ कार्यकर्ते सुभाष भास्कर महाजन यांची यावल तालुका काँगेस कमेटी उपाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली आले. तर यावल तालुका काँगेस कमेटी उपाध्यक्ष पदी भालोद येथिल किशोर लक्ष्मण महाजन,उपाध्यक्षपदी कलीमखान मन्यार फैजपूर, उपाध्यक्ष पदी अनिल प्रल्हाद पाटील कोळवद, उपाध्यक्ष पदी वासंतीलाल लीलाधर महाजन न्हावी, कमाल कान्हा तडवी परसाळे, अनिल प्रल्हाद साळुंके चिंचोली, सरचिटणीस पदी योगेश सिताराम पाटील राजोरा, सै. मसरूर अली मो. अली मारूळ, अमर अभिमन कोळी यावल, वासुदेव मुरलीधर पाटील मोहराळे, गणेश मुरलीधर गुरव फैजपूर, भरत धनसिंग चौधरी थोरगव्हाण, गिरीष वसंतराव देशमुख नायगाव, खजिनदारपदी महेश डिंगबर राणे हिंगोणा,सह सरचिटणीस पदी डिगंबर विठ्ठल चौधरी वानोली, अनिल नीलकंठ जंजाळे यावल, प्रितम प्रकाश राणे डो. कठोरा, सचिन बिऱ्हाम तडवी नायगांव,विजय नेमा चौधरी विरोदा, डिगंबर बाबुराव सपकाळे अंजाळे, सह खजिनदार पदी सर्फराज सिकंदर तडवी न्हावी, रविंद्र काशिनाथ पाटील चुचाळे, ऑड. सुरज मनोहर पाटील पडळसा, तुषार राजाराम राणे फैजपूर, उल्हास गोपाळ सरोदे डांभुर्णी, सर्फराज युनुस पिंजारी किनगाव, चिटणीस पदी युवराज सुभाष भंगाळे सांगवी बु, नितीन एकनाथ झांबरे बामणोद,मतिउर रहेमान मुजीबुद्दीन पिरजादे मारूळ, दिनकर नागो फेंगडे दहिगाव, सुनिल निळसिंग पाटील निमगाव, शुभम गिरीष विसवे डांभुर्णी,रुबाब महंमद तडवी यावल, जगदीश भाऊराव पाटील उंटावद, सदस्य पदी इकबाल बाबू तडवी बोरखेडा खुर्द,शे. नईम शे.शरीफ यावल, करण दिलीप पाटील सांगवी खुर्द, तौफिक रज्जाक पटेल यावल, अजय वसंत तायडे पाडळसा, प्रविण भानू हटकर मारूळ, राहुल भास्कर पाटील किनगाव बु, वासुदेव सीताराम पाटील मनवेल, अशोक तुळशीराम तायडे महेलखेडी, दारासिंग आपसिंग बारेला उसमळी, प्रदीप बाळकृष्ण पाटील वड्री, शरद सुकलाल पाटील विरावली, सुनिल भिवसन अढायणे कोळवद,काशिनाथ तिख्या बारेला जमन्या, सल्लागार पदी सै. जाविद अहमद मो अली मारूळ, ज्ञानेश्वर श्रीधर बऱ्हाटे पाडळसा, अनिल रामचंद्र महाजन कोळवद, दिलीप बापूराव पाटील दहिगाव, उमाकांत रामराव पाटील किनगाव आदिची नियुक्ती करण्यात आली असुन जिल्हा काँग्रेस कमिटी व यावल तालुक्यातील राष्ट्रीय काँगेस पक्षाच्या आजी माझी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले असुन अनेक राजकीय पक्षांना वाटतं आहे की यावल तालुक्यातील काही मतम्बर काँग्रेस पक्ष सोंडून भाजप पक्षात प्रवेश करून गेले असतांना यावल तालुक्यातील काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल पण तसे नव्हता उलट यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्ष मजबूत होणार असल्याचे चित्र दिसुन येत असुन काँग्रेस पक्ष सोडुन गेलेल्या माजी जि. प. सदस्य यांना पच्छातापाची वेळ येते की काय अशी ही यावल तालुक्यात चर्चा रंगू लागल्या असल्याने यावल तालुक्यात येणाऱ्या आगामी निवडणुकीत काँग्रेस हा मोठा पक्ष नक्की ठरू शकतो असे चांगले वातावरण काँग्रेसचे असल्यामुळे काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काँगेस पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
























