यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि.12 महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांची त्यांच्या पाळधी (ता. धरणगाव) येथील निवासस्थानी विशेष भेट घेण्यात आली. या भेटीप्रसंगी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी व फील्ड वर्कर्स यांच्यासमोर निर्माण झालेल्या विविध गंभीर आणि दीर्घकालीन प्रशासकीय अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
🔹 निवेदनातील मुख्य मागण्या:
1. फील्ड वर्कर्ससाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली रद्द करावी
– अनेक दुर्गम, डोंगराळ व नेटवर्कअभावी भागांमध्ये कार्यरत कर्मचारी Biometric Face Attendance प्रणालीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांच्यावरील हा ताण कमी करून मानवीय व व्यवहार्य पर्यायी हजेरी प्रणाली लागू करण्यात यावी.
2. वेतन वितरण प्रक्रियेत वेळबद्धता आणावी
– कुबेर प्रणालीतील त्रुटींमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे मिळत नाही. त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होत असून, ही प्रक्रिया पारदर्शक व वेळेवर व्हवी.
3. NCD प्रकल्पासाठी थकीत अनुदान वितरित करावे
– संबंधित कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.
4. 30 नव्याने नियुक्त झालेल्या तसेच बदली झालेल्या सेवकांच्या पदमंजुरीसह नियमित वेतन मिळावे
– 2025 मध्ये नियुक्त झालेल्या सुमारे 30 आरोग्य कर्मचार्यांच्या पदांना अद्याप ग्रामविकास मंत्रालयाकडून अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही.
तसेच, प्रशासकीय बदलीनंतर काही कर्मचाऱ्यांची पदमंजुरी प्रक्रिया अपूर्ण असल्याने त्यांचे वेतन रखडले आहे. या दोन्ही मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही व्हावी.
5. 10, 20, 30 वर्षे सेवेनंतरची कालबद्ध पदोन्नती (ACP)
– अनेक कर्मचारी आपल्या कार्यकाळात 10, 20, 30 वर्ष पूर्ण करूनही नियमानुसार पदोन्नतीपासून वंचित आहेत. त्यांना त्वरित पदोन्नती लाभ मिळावा.या भेटीप्रसंगी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, शाखा – जळगाव (नों. क्र. 257/89) यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पाटील जिल्हाध्यक्ष,पुष्पजीत सोनवणे – जिल्हा सचिव दिनेश चौधरी – जिल्हा कार्याध्यक्ष सौ. वहिदा खान –सह-कोषध्यक्ष सौ. सैंदाणे सिस्टर – तालुका पदाधिकारी सौ. कामिनी किंनगे – तालुका पदाधिकारी संघटनेच्या वतीने माननीय पालकमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले की, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी ऐकून घेतल्या व वास्तविक आणि तातडीच्या निर्णयासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
🔹 या भेटीद्वारे कर्मचार्यांच्या प्रश्नांना नक्कीच गती मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
























