Homeशिक्षण-प्रशिक्षणतालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत अंजुमन उर्दू विद्यालय साकळीचे यश

तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत अंजुमन उर्दू विद्यालय साकळीचे यश

यावल दि . १तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे )
यावल तालुका शिक्षण विभाग आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी विकास विद्यालय सातोद येथे करण्यात आले. या स्पर्धेत वयोगट १४ वर्षे व १९ वर्षे अशी दोन गटांतील मुलांची सामने घेण्यात आले. स्पर्धेत एकूण १४ संघांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत साकळी येथील अंजुमन-ए-इस्लाम उर्दू विद्यालयाने दोन्ही गटात विजेतेपद पटकावून गावाचे नाव उज्ज्वल केले.
१४ वर्ष वयोगटात जे.टी. महाजन सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, फैजपूर उपविजेते ठरले.
१९ वर्ष वयोगटात अँग्लो उर्दू हायस्कूल, मारूळ उपविजेते ठरले.
स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी विकास विद्यालय सातोदचे मुख्याध्यापक एच.डी. पाचपोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन एस.टी. पाटील, संचालक मंडळ सातोद, तालुका क्रीडा समन्वयक दिलीप संगेले तसेच विविध शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.बी. वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक के.आर. सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन एच.पी. चौधरी यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विकास विद्यालय सातोदचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अंजुमन उर्दू विद्यालयाच्या या यशाबद्दल सर सैय्यद एज्युकेशन सोसायटी साकळीचे अध्यक्ष हाजी सत्तार खान, उपाध्यक्ष सैय्यद अहमद व इस्माईल खान, चेअरमन हाजी निसार खान, सचिव के.बी. खान तसेच सर्व पदाधिकारी व सभासद, मुख्याध्यापक इरफान खान, शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक फैसल खान व युसूफ खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने त्यांचाही विशेष आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!