Homeताज्या बातम्याजळगाव जिल्हाधिकारीपदी बदली ठाणे येथुन रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली

जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली ठाणे येथुन रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली

मुंबई दि. 7 (प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करून जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी अ.शा.प.क्र.एईओ-११२५/५/२०२५/भाप्रसे-१ या क्रमांकाने हा आदेश निर्गमित केला असून, आदेशावर अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या आदेशानुसार,  घुगे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्याकडे त्वरित सोपवावा आणि जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भाप्रसे यांच्याकडून स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बदलीनंतर रूजू अहवाल Supremo प्रणालीवर (ER Sheet मधील Posting कॉलममध्ये) अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कार्यभार हस्तांतरण करताना शासनाने दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. नवीन पदावर रूजू झाल्यानंतर पूर्वीच्या पदावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल व कार्यमूल्यांकन अहवाल विहीत वेळेत लिहावेत, असेही निर्देश आहेत. या आदेशाची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी महसूल व वन विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, नाशिक व कोकण विभागीय आयुक्त, तसेच  आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव) आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय यांना पाठवली आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव कार्यालयांनाही आदेशाची प्रत माहितीस्तव देण्यात आली आहे.

ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना  रोहन घुगे यांनी प्रशासनिक पातळीवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. आता ते जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार असून, त्यांच्या नवीन कार्यकाळाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!