Homeउद्योगकर्जमाफीच्या फसव्या घोषणा सहकारी संस्थांना मारक- चंद्रशेखर कुलकर्णी

कर्जमाफीच्या फसव्या घोषणा सहकारी संस्थांना मारक- चंद्रशेखर कुलकर्णी

धामोरी दि .1 प्रतिनिधी (दत्तात्रय घुले ) कोपरगाव तालुक्यातील प्रगती पथावर असलेल्या धामोरी वि.का.सेवा सह. सोसायटीची ७५ वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे चेअरमन मा.श्री.चैतन्य चंद्रशेखर कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली व कर्मवीर शंकरराव काळे सह.साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर मोहनीराज कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चद्रशेखर कुलकर्णी यांनी स्व. पंडीतराव कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सन १९५० मध्ये स्थापन केलेली संस्था आज प्रगतीपथावर असुन चालु वर्षी संस्थेचा नफा पोटनियमा प्रमाणे २५% राखीव निधी मध्ये वर्ग व आवश्यक त्या तरतुदी करुन उर्वरीत नफा संस्थेच्या अमृत महोत्सव निधी मध्ये वर्ग केला जाणार असल्याचे सांगितले.संस्थेचा चालु वर्षी अमृत महोत्सव असुन त्यानिमित्त संस्थेच्या हयात असलेल्या सभासदांना संस्थेमार्फत प्रत्येकी १० ग्रॅम चांदीचे नाणे वाटप करण्याचा संस्थेचा मानस आहे.संस्थेमार्फत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे शेती व्यवसायासाठी कर्ज वितरण,सर्व प्रकारचे रासा.खतांची विक्री,कृषी औषधांची विक्री व स्वस्त धान्य दुकान चालविले जाते.चालु वर्षी संस्थेस प्रधानमंत्री जेनेरिक औषधी करिता लायसन्स प्राप्त झालेले आहे.’रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा’ या उ‌द्देशाने जन औषधी केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना स्वस्तात इतर मेडीकल्सच्या तुलनेने साधारणतः ६६% सवलतीच्या दरात भारतीय औषधनिर्माण शास्त्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार तपासलेली,प्रमाणित उच्च दर्जाची व नामांकित कंपन्यांची दर्जेदार औषधे उपलब्ध होणार आहेत. याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी संस्था नावारुपास येण्यासाठी सभासद,आजतागायत लाभलेले पदाधिकारी व संचालक यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. शेतकऱ्यांनी शासनाच्या भरवशावर शेती धंदा करु नये.विवीध प्रकारचे पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कर्जमाफीच्या घोषणा करतात.सत्ता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कर्जमाफी मात्र दिली जात नाही.त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढते.परिणामी, वसुली अभावी सहकारी संस्था अडचणीत येतात. शासनाने सुरु केलेल्या योजनाही पुढे चालु राहतीलच असे नाही. शेतकऱ्यांनी स्वयंपुर्ण होणे गरजेचे आहे.कर्ज वसुली हा सहकारी संस्थांचा आत्मा असुन राज्यातील अनेक सहकारी संस्था शेवटच्या घटका मोजत आहेत.सहकारी सस्थांचे तोटे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या खतांचे,मजुरीचे,इंधनाचे वाढलेले भाव,अनियमित वीज पुरवठा व इलेक्ट्रीक बिलाची सक्तीची वसुली या सर्व गोष्टीमुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे.अनेक सभासदांनी संस्थेबद्दल गौरवास्पद भाषणे केली.संस्थेचे चेअरमन श्री.चैतन्य कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले.माजी व्हा.चेअरमन बाबुराव दरेकर,कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे इनस्पेक्टर प्रा.नारायण बारे सर,गौतम सहकारी बँकेचे संचालक रामराव माळी,भास्करराव वाघ,आनंदराव वाघ यांची समयोचित भाषणे झाली.सभेस गौतम बँकेचे माजी व्हा.चेअरमन पुंडलिक माळी,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मनोज जगझाप,शरदराव पवार पतसंस्थेचे माजी चेअरमन सुदामभाऊ गाडे, पंडीतराव कुलकर्णी पतसंस्थेचे चेअरमन अरुण पा.भाकरे,संस्थेचे व्हा. चेअरमन राजेंद्र वाघ, संचालक माणिक सोमासे, अनिल दरेकर,कैलास बारे, पोपटराव माळी,अभिजीत उसरे,विलास माळी,प्रविण खिलारी,भाऊसाहेब माळी, भाऊसाहेब खिलारी, दिलीपराव माळी,सतिश कोळपे,पतसंस्थेचे संचालक राजेंद्र वाईकर, रविंद्र माळी,पत्रकार निवृत्ती शिंदे,भाऊसाहेब मांजरे,दत्तात्रय माळी, दिलीप खिलारी व मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते.गौतम सहकारी बँकेचे संचालक रामराव माळी यांनी आभार मानले.सभेचे सुत्रसंचालन संचालक प्रा. संदिप जगझाप सर यांनी तर सचिव मनोज कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!