Homeउद्योगसाकळी सह परिसरात कपाशीचा पेरा घटला  उत्पन्नात मोठी घट...मक्याचा पेरा वाढला...

साकळी सह परिसरात कपाशीचा पेरा घटला  उत्पन्नात मोठी घट…मक्याचा पेरा वाढला…

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि .30 वाढत्या महागाईमुळे कपाशी पिकाला अतोनात खर्च वाढल्याने तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उत्पन्नात मोठी घट येत असल्याने उत्पादन व खर्च यात कोठेच ताळमेळ बसत नसल्याने मागील वर्षी शेतकऱ्यांना कापूस पिकात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले त्यामुळे यंदाच्या हंगामात कापूस पीक लागवडीकडे परिसरातील शेतकऱ्यांनी चक्क पाठ फिरवली असून साकळीसह परिसरात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे.कपाशी ऐवजी मका,तूर या पिकांचा पेरा वाढला आहे. या गंभीर अशा शेती प्रश्नाकडे संबंधित कृषी विभागाने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,कापूस पीक आहे नगदी पीक म्हणून समजले जाते व या पिकाकडे अल्पभूधारक शेतकरी नेहमीच मोठ्या आशेने पाहत असतो. तथापि साकळीसह परिसरात गेल्या मागील हंगामात एकूण पिकांच्या टक्केवारी पैकी जवळपास २५ ते ३० टक्के आगात (बागायती) तसेच कोरडवाहू कापूस पिकाची लागवड होती.व उरलेल्या पिकात केळी,मका,ज्वारी सह इतर पिके होती.मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते तसेच अळी-किडचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यामुळे दोघ प्रकारच्या कपाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पन्नात घट आल्याने कापूस उतारा अगदी जेमतेम आला.कोरडवाहू कपाशीचा एक ते दोन क्विंटल तर बागायती कपाशीचा तीन ते चार क्विंटल याप्रमाणे शेतकऱ्याला उत्पन्न झालेले होते.त्यात या पिकास शेतकऱ्यांनी खूप मोठा खर्च केलेला होता.पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप कष्ट, मेहनत ही केली.मात्र कपाशीला शेवटपर्यंत जेमतेम सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल दरम्यानच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना कपाशी पिकासाठी लागलेला खर्चही निघाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज काढून कुठे हात उसनवारी करून कपाशी पीक उभे केले.मात्र पिकासाठी लागलेला अवाढव्य खर्च,मेहनत, हाती काही न आल्याने या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे झाले.त्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस पिकाकडे चक्क पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.यंदा कपाशीचा जेम-तेम पेरा असून तो १० ते १५ टक्क्यावर आलेला आहे.ही शेती क्षेत्रासाठी अतिशय चिंतेची बाब असून शेतकऱ्याला कपाशी पीक अधिक खर्चिक व परवडणारे नसेल तर येत्या पुढील काही वर्षात कपाशीचा पेरा शुन्य टक्क्यावर वर आलेला असेल.यात कुठलीही शंका नाही.कपाशीचे बियाणे,रासायनिक खते,फवारणी यांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून कपाशी लावणे- वेचणीची मजुरी ही महाग होत आहे.त्याप्रमाणाणे निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्याला कपाशीचे उत्पादन पाहिजे तेवढ्या अपेक्षेने येत नसल्याने तसेच आलेल्या कपाशीच्या मालाला योग्य असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा कपाशी पिकाचा ताळमेळच चुकलेला आहे.मागच्या हंगामातील कपाशी पिकाची झालेली परवड पाहता ‘ कपाशीचे पीक…. नकोरे बापा !’ असा सूर शेतकरी एकमेकांशी चर्चा करताना आळवत आहे.
पर्यायाने शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळलेला असल्याचे दिसून आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केळीची लागवड केलेली असून उर्वरित शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात मका,तूर,ज्वारी इतर नगदी पिके लावलेली आहे.या गंभीर प्रश्नाकडे मायबाप सरकार व संबंधित कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.येत्या काळात जर कापूस पिकापासून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी त्या पिकाकडे पाठ फिरवली तर भविष्यात पुन्हा त्या पिकाकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता होणार नाही आणि मग ही मानसिकता तयार करण्यासाठी प्रशासनाला खूप मोठी मेहनत करावी लागेल एवढं मात्र निश्चित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!