Homeशिक्षण-प्रशिक्षणशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन - शैलेश पाटील अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला :...

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन – शैलेश पाटील अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते शैलेश पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद 

यावल दि .17 ( प्रतिनिधी ) हुशारी ही केवळ गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रांवरूनच ठरते का ? असा प्रश्न उपस्थित करत व्याख्याते शैलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. आज प्रमाणपत्रासाठी शिक्षण घ्यावे, असा अट्टाहास केला जातो. मात्र केवळ प्रमाणपत्रासाठी शिक्षण नको, तर आयुष्यभर चालणारे आपले शिकणे प्रमाणित करता आले पाहिजे. सध्या शिक्षित व अशिक्षित यांच्यातील फरक जाणवत नाही. अनेकदा शिकलेले लोकही अडाणीपणाने वागतात, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे दि. १७ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज, भालोद, ता. यावल येथे माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे प्रथम पुष्प भुसावळ येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी गुंफले. ’शिक्षण म्हणजे काय ?’ या विषयावर ते बोलत होते. यंदा व्याख्यानमालेचे आठवे वर्ष होते. विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन हेमलता इंगळे, उपाध्यक्ष गोपाळ चौधरी, जेष्ठ संचालक अरुण चौधरी, पितांबर इंगळे, प्रदीप जावळे, शरद जावळे, प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे, मुख्याध्यापक डी.व्ही चौधरी, प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, सहसमन्वयक ललित महाजन उपस्थित होते.

पोट भरणे म्हणजेच शिक्षण नव्हे, तर शिक्षणातून जीवनाला अर्थ, समाधान आणि आनंद मिळायला हवा. ‘मी’पेक्षा ‘आम्ही’ ही भावना जोपासली, इतरांच्या आनंदात सहभागी झालो, तर तो आनंद द्विगुणित होतो, असे मत यावेळी चेअरमन हेमलता इंगळे यांनी व्यक्त केले. शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता, समाजाशी नाते जोडणारे आणि मानवी संवेदना समृद्ध करणारे असावे, असेही त्यांनी नमूद केले.

तुमच्या वर्तनातून समाजाला तुमच्या शिक्षणाची पातळी दिसली पाहिजे. विवेक व सुसंस्कार विकसित झाले नाहीत, तर शिक्षण असूनही सारासार विचार करण्याची क्षमता निर्माण होत नाही, असा सल्ला व्याख्याते शैलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सर्वांग सुंदर जीवन जगण्याची पहिली पायरी म्हणजे शिक्षण होय. समाज झपाट्याने बदलत असला, तरी त्या वेगाने शिक्षणात अपेक्षित परिवर्तन घडत नाही, ही चिंतेची बाब आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते शिक्षण मर्यादित न राहता, चराचर सृष्टीशी नाते जोडणे, जीवनमूल्ये आत्मसात करणे हेच खरे शिक्षण आहे असा सल्ला शैलेश पाटील यांनी या प्रसंगी दिला. महान व्यक्तींच्या विचारांचा आणि प्रेरणादायी वचनांचा आधार घेत त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ केला.

प्रबोधनमालेसाठी रावेर विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन आणि जळगावचे उद्योजक अजय बढे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन जी.एस.पाटील यांनी केले तर आभार एस.एम.तायडे यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य डॉ. संजू भटकर, मंगेश भावे, युवराज सरोदे, हितेश जावळे, गौरव जावळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!