Homeशिक्षण-प्रशिक्षणचासनळी येथील तिडके पाटील विद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

चासनळी येथील तिडके पाटील विद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

चासनळी प्रतिनिधी ( नवनाथ उल्हारे ) दि 9 कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालयात पालक मेळावा उत्साहात यशस्वीपणे संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढावा, असे उद्दिष्ट घेऊन हा मेळावा आयोजित करण्यात आला .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री ए. आर. मांडवडे यांनी केली. दवंगे एस. यू. हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री आर. के. मोरे यांचे प्रास्ताविक व स्वागतांने झाली. श्री मोरे यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे सखोल वर्णन करत पालकांना शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

प्राचार्य मांडवडे यांनी शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे परीक्षण, उपस्थिती, वर्तन आणि विविध सहशालेय उपक्रमांविषयी पालकांना माहिती दिली. पालकांनी शाळेच्या कार्यपद्धतीचे व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले. यावेळी बक्तरपुर ग्रामपंचायतचे सरपंच श्री गणेश नागरे यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शाळेसाठी वॉटर प्युरिफायर घेण्यास पालकांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाची  सांगता कलाशिक्षक श्री निलकंठ पी. ए. यांनी आभार प्रदर्शन करीत सांगता केली. त्यांनी पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि शाळेच्या विकासाबाबत असलेला विश्वास व्यक्त केला.

या पालक मेळाव्यामुळे पालक व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक सुदृढ झाला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची दिशा निश्चित झाली आहे. या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यालयातील प्राचार्य श्री. ए. आर. मांडवडे, पर्यवेक्षक दवंगे एस. यु., तसेच शिक्षक व कर्मचारी मंडळींनी विशेष मेहनत घेतली.

तिडके पाटील विद्यालयातील हा पालक मेळावा हा शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करायला व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल असल्याचे पोषक चित्र उभे करते. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शालेय वातावरण अधिक समृद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करता येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!