Homeताज्या बातम्याअटवाडेतील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह...निकृष्ट कामाचा आरोप; तक्रारी नंतर ही प्रशासनाकडून दखल...

अटवाडेतील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह…निकृष्ट कामाचा आरोप; तक्रारी नंतर ही प्रशासनाकडून दखल नाही…

रावेर दि . 12 (प्रतिनिधी )  रावेर तालुक्यातील अटवाडे येथे सुरू असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य गोकुळ भाऊराव करवले यांनी केला आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती रावेर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र तक्रारीनंतरही प्रशासनाकडून कोणती ही ठोस कारवाई किंवा चौकशी झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाखो रुपयांच्या अंदाजपत्रकाचे हे बांधकाम प्रत्यक्षात अंदाजपत्रकानुसार न होता मनमानी पद्धतीने सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बांधकामस्थळी शासन नियमांनुसार आवश्यक असलेला माहितीफलक (कामाचा बोर्ड) देखील लावलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे काम कोणत्या विभागामार्फत सुरू आहे, कामाचा खर्च किती आहे तसेच ठेकेदार कोण आहे याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकामाच्या ठिकाणी निधी, कामाचा तपशील, ठेकेदाराचे नाव व कामाचा कालावधी दर्शविणारा माहितीफलक लावणे बंधनकारक असते. मात्र अटवाडे येथील या कामात त्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्यामुळे लाखो रुए निधीचा अपव्यय होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू असून तक्रारीची तात्काळ दखल घेऊन या बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दोषींवर कठोर कारवाई करून निकृष्ट दर्जाचे काम थांबवावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, प्रशासनाने या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारवाई केली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य गोकुळ भाऊराव करवले यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे अटवाडे गावासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

 कामाचा माहितीफलकच नाही….

अटवाडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामस्थळी शासन नियमानुसार लावायचा माहितीफलकच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामाचा खर्च, ठेकेदाराचे नाव व कामाचा कालावधी याबाबत कांना कोणतीही माहिती मिळत नसल्याने पारदर्शक प्रश्न उपस्थित होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!