Homeशिक्षण-प्रशिक्षणअंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य” १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य” १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

भुसावळ दि .27 ( प्रतिनिधी ) “सण-उत्सवांच्या खर्चात बचत करून सामाजिक कार्यात वळवला तर समाजाला खरी दिशा मिळते. अंतर्नाद प्रतिष्ठानने दाखवलेला मार्ग हा लोकमान्य टिळकांच्या विचारांना साजेसा आहे. आज विद्यार्थ्यांना मिळालेली ही मदत भविष्यात त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देईल आणि या उपक्रमाचा वारसा ते पुढे चालवत राहतील,” अशा भावना मान्यवरांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी गणेशोत्सवात राबविण्यात येणाऱ्या ‘एक दुर्वा समर्पण’ या उपक्रमाला यंदा नऊ वर्षे पूर्ण झाली. यावल तालुक्यातील विरोदा व वढोडे जिल्हा परिषद शाळांतील १२० विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी पाटी, पेन्सिल, वह्या, पेन, पट्टी, रंगपेटी, खोडरबर व बालमित्र पुस्तक यांसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गणेशोत्सवात बचत करून दात्यांच्या मदतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा ठरला.

या प्रसंगी सरपंच जीवन तायडे, उपसरपंच विनोद झाल्टे, शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत बऱ्हाटे, स्वप्नील जावळे, पोलीस पाटील पुरुषोत्तम पाटील, सतीश चौधरी, सुनील चौधरी, अमोल वारके, पंकज बऱ्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी, आभार प्रकल्प समन्वयक कपिल धांडे यांनी मानले. संस्थेचा परिचय प्रकल्प सह-समन्वयक केतन महाजन यांनी तर सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले.

उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रसन्न बोरोले, विक्रांत चौधरी, जीवन महाजन, कुंदन वायकोळे, तेजेंद्र महाजन, उमेश फिरके, विपीन वारके, योगेश साळुंखे यांच्यासह अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

दरवर्षी पाच शाळांची निवड करून राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करत असून समाजात दानशूरता आणि जबाबदारीची भावना रुजवतो. ‘एक दुर्वा समर्पण’ म्हणजे फक्त साहित्यवाटप नसून, समाजाला एकत्र आणणारी आणि उपक्रमशीलतेला दिशा देणारी सामाजिक चळवळ आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!