Homeशिक्षण-प्रशिक्षणजिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे व पिंपळगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे व पिंपळगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद संपन्न

भुसावळ दि .26 (प्रतिनिधी)  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याप्रमाणे केंद्रातील एका शाळेमार्फत आयोजित करण्यात येणारी शिक्षण परिषद यावेळी वरणगाव व तळवेल केंद्राच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडली. वरणगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे व तळवेल केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव खुर्द यांच्या वतीने सिद्धेश्वर नगर, वरणगाव येथील शाळेत या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख राजेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. केंद्रप्रमुख राजेश पाटील, मुख्याध्यापक अनिल देशपांडे, मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, वंदना पाटील, उपशिक्षक अशोक तायडे व गुणवंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

परिषदेच्या दरम्यान विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अध्ययन-अध्यापन साहित्य व प्रश्ननिर्मिती या विषयावर उपशिक्षक अशोक तायडे यांनी मार्गदर्शन केले.

“माझा वर्ग माझे नियोजन” या विषयावर तळवेल शाळेचे उपशिक्षक उमेश कोल्हे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

पायाभूत अध्ययन सर्वेक्षण या विषयावर उपशिक्षिका सौ. रेखा चौधरी यांनी माहिती दिली.

तर स्थानिक पातळीवरील विषय या संदर्भात टहाकळी येथील उपशिक्षिका दिपाली भंगाळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रप्रमुख राजेश पाटील यांनी सर्व शाळांच्या शैक्षणिक तसेच शासकीय कामकाजाचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना दिल्या.

या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन काहुरखेडे शाळेतील उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पिंपळगाव खुर्द येथील उपशिक्षिका सविता चंद्रिकापुरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धेश्वर नगर येथील मुख्याध्यापक अनिल देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच काहुरखेडे शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, ममता तडवी व पिंपळगाव खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील तसेच उपशिक्षिका सविता चंद्रिकापुरे यांनी नियोजनपूर्वक तयारी करून परिषद यशस्वीरित्या पार पाडली. या कार्याबद्दल दोन्ही केंद्रांतील शिक्षक-शिक्षिकांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!