Homeताज्या बातम्यारावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे अपघाताचा धोका; शेतकऱ्यांच्या पिकांनाही फटका

रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून सैल खडीमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक केली जाते. तसेच शाळेच्या बसेस आणि अतुर्ली-मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. मात्र, डांबरीकरण न झाल्याने वाहनांच्या हालचालीदरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.

उडणाऱ्या धुळीचा थेट परिणाम शेतातील पिकांवर होत असून पिकांवर धुळीचा थर साचून त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय, उडणारी खडी आणि धुळीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना वाहन चालवताना मोठा धोका निर्माण झाला आहे.

या परिस्थितीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करून लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिक आणि शेतकरी वर्गातून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

error: Content is protected !!