धामोरी दि . 22 प्रतिनिधी ( दत्तात्रय घुले ) सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील स्वाभिमानी युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रेम उर्फ पवित्र जयश्री सुरेश मोरे यांची राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषद या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सहपत्नी सौ. सुप्रिया प्रदीप मोरे यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक येथील संस्थेच्या कार्यालयात महाराष्ट्र अध्यक्ष उद्योजक रामकृष्ण बनसोडे व महिला प्रदेश अध्यक्षा भालेराव ताई यांच्या हस्ते दोघांनाही नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रेम मोरे हे बुद्ध, शिवशाही, फुले, आंबेडकर, काशीराम यांच्या विचारांच्या चळवळीत गेल्या १७ वर्षांपासून सक्रिय असून बहुजन समाजाच्या सामाजिक, राजकीय व धार्मिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करत आहेत. बहुजन समाज पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी विचारसभा अध्यक्षपदापासून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
२०१७ मध्ये कोळकी पंचायत समिती, २०१९ मध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ तसेच २०२६ मध्ये कोळकी व बरड जिल्हा परिषद गटातून बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या निशाणीवर निवडणुका लढवल्या होत्या. सामाजिक कार्यासोबतच ते ग्रामपंचायत ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक म्हणूनही काम करत आहेत.
तसेच ते स्वतःचे दोन यूट्यूब चॅनेल चालवित असून हिरानाना फाऊंडेशन व भारतमाता महिला नारी निकेतन या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व शासकीय योजनांबाबत जनजागृतीचे काम करत आहेत. पत्रकारितेचा अनुभव, संविधानिक पद्धतीने विचार मांडण्याची शैली आणि निर्भीड भूमिका यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे फलटण व परिसरात त्यांचे कौतुक होत असून विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
























