रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक 17 मे 2026 रोजी दिव्यांग व अव्यंग वधू-वरांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, रावेर तालुक्यात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजात सकारात्मक संदेश देणारा हा विवाह सोहळा ठरणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत विवाहासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या इच्छुक दिव्यांग वधू-वरांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले नाव व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत :

श्री संजय दिनकर बुवा (रावेर) – 9420072395
श्री . घनश्याम प्रभाकर हरणकर ( विवरे) – 9011261754
श्री .विशाल रत्नाकर कासार (सावदा) – 9623632322
श्री . रजनीकांत शामराव बारी (रावेर) – 9175069972
श्री . संदीप रामदास पाटील (केन्हाळा) – 9673301030
श्री .प्रवीण पुंडलिक धनगर (आटवडा) – 9158464687
श्री .कैलास पांडुरंग महाजन (कुसुंबा) – 8390187578
श्री .दिलीप हिरालाल जैन (सावदा)
सौ. ज्योती रजनीकांत बारी (रावेर)
आवश्यक कागदपत्रे :
१) आधार कार्ड (मूळ)
२) जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
३) रेशन कार्ड
४) बँक पासबुक
५) दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड)
या विवाह योजनेअंतर्गत शासनाकडून विशेष आर्थिक सहाय्य देखील दिले जाणार आहे.
वर-वधू दोघेही दिव्यांग असल्यास ₹2.5 लाख
एक जण दिव्यांग असल्यास ₹1.5 लाख अनुदान मिळणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
हा विवाह सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून, समाजातील समतेचा आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारी चळवळ ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
























