यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद मुला – मुलींची शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांना साजरा करण्यात आला ,या प्रसंगी शाळेच्या वतीने दाखल पात्र विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले,
परंतु इतर गावातील ग्रामपंचाययतीने मराठी शाळेत शिक्षण घेण्यासाठी जनजागृती करून अनेक गावातील सरपंच यांनी ग्रामसभेत ठराव करून मराठी शाळेत पाल्यांना शिक्षण घेतल्यास एक वर्षाची घर पट्टी नळ पट्टी, दिवा बत्ती माफ करण्याचा निर्धार करून गावाचे व गावातील पाल्यांना मराठी शाळेत उत्तम दरज्याचे शिक्षण मिळावे व गावातील पाल्यांना मराठी भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणुन मोठ्या प्रमाणात अनेक ग्रामपंचायतिने एकमताने ठराव केले असे साकळी गावात ही होईल का? असे साकळी गावातील अनेक पालकांना अपेक्षा असतांना साकळी गावातील सरपंच व ग्रामपंचायत किती लक्ष देऊन काम करते व किती प्रमाणात मराठी शिक्षण हे मराठी शाळेत घेण्यास साकळी गावात जनजागृती करते याकडे साकळी गावातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
साकळी गावात प्रथम जि शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस असल्याने प्रभात फेरी मध्ये सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक, व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.प्रभात फेरी नंतर साकळी गावचे लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील,उपसरपंच व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व पालक यांच्या उपस्थितीत इयत्ता १ ली च्या वर्गात दाखल पात्र विद्यार्थ्यांना दाखल करून घेतले तसेच त्यांना पाठ्यपुस्तक ,गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती साकळी बॉईज अध्यक्ष सौरभ जैन सर, शाळा व्यवस्थापन समिती साकळी कन्याअध्यक्ष सचिन सोनवणे व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.यावेळी सरपंच पुरस्कार दिपक पाटील यांचा सत्कार दोन्ही शाळा समितीमार्फत करण्यात आला.मुख्याध्यपक पिंगळे सर व मुख्याध्यापिका मनिषा पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर .धालपे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले समाधान कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
























