रावेर दि .29 (प्रतिनिधी ) रावेर येथील व्ही एस नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर उपस्थित खेळाडूंना मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले व खेळांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच खेळाळुनी विदयापीठासाठी जास्तीत जास्त पदक प्राक्त करावे हा संकल्प मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणेने घ्यायला हवी असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.यु पाटील उपस्थित होते.
क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये खेळ प्रवृत्ती जिवंत असणे काळाची गरज आहे असे प्रतीपादन केले या प्रंसगी महाविद्यालयात विवीध स्पर्धाच्या आयोजन करण्यात आले त्यात
कॅरम त्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा स्पर्धा, तायकांडो, रग्बी अशा खेळांचा समावेश होता. संबंधित खेळामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कॅरम स्पर्धा महिला संघ प्रथम क्रमांक कु. रूतीका इंगळे व प्रीती ठाकणे, द्वितीय क्रमांक मानसी पाटील व हर्षा पवार. पुरुष संघ प्रथम कु. संदीप महाजन व सुजीत मोरे, आणि अनीकेत परदेशी हे ठरले सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे व खेळाडूंचे यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन आले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. स्पर्धाचे सुत्र संचालन डॉ उमेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा एस यु पाटील यांनी केले .
























