Homeताज्या बातम्याविटवे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार; गटार सफाईसाठी काढले हजारो रुपये तरी घाण कायम...

विटवे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार; गटार सफाईसाठी काढले हजारो रुपये तरी घाण कायम…

रावेर दि 25 (प्रतिनिधी ) रावेर तालुक्यातील विटवे सांगवे ग्रुप ग्रामपंचायत गटार साफ सफाई साठी महिन्याला हजारो रुपये काढले जात आहेत, मात्र ग्रामस्थांच्या सततच्या तक्रारीं नंतर ही गटार साफ नाही होत. या कारभारामुळे गावात घाण आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरत असून, डेंगू सारखे गंभीर आजार ही उद्भवत असल्याचा संतप्त आरोप स्थानिकांनी केला आहे. दलित वस्ती आणि गरीब भागांमध्ये दुर्लक्ष केल्याने रहिवाशांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.

विटवे सांगवे ग्रुप ग्रामपंचायतने गटार साफ सफाई साठी महिन्याला हजारो रुपये ग्रामपंचायत कडून काढले केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, या वित्तीय खर्चाचा परिणाम गावातील स्वच्छतेवर दिसत नाही, त्यामुळे नागरिकांत नाराजी आणि संताप वाढत आहे. विशेषतः दलित वस्तीतील रहिवासी आरोग्यदृष्ट्या गंभीर धोक्यात असून, डेंगू आणि इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचा भास स्पष्ट होतो आहे.

परंतु, ग्रामपंचायत आणि लोकनियुक्त सरपंचांकडे गटार साफ सफाई साठी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, स्वच्छतेच्या अभावामुळे गावातं अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य साहेबराव वानखेडे यांनी तात्काळ गटार साफसफाई होण्याची मागणी करत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

साहेबराव वानखेडे यांचे म्हणणे आहे की, “गटार स्वच्छता न केल्यामुळे गावातील नागरिकांचा आरोग्याच्या बाबतीत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष करून गरीब व दलित वस्त्यांमध्ये या समस्येला सावत्र वागणूक दिली जात नाही, हे दुरास्था आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही मुख्यकार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार देणार आहोत, जेणेकरून यावर त्वरित उपाययोजना होईल.”

विटवे येथील ग्रामपंचायतचे स्वच्छता विषयक दुर्लक्ष आणि गटार साफ सफाईचा अभाव फक्त आरोग्य कारणांसाठी नव्हे तर सामाजिक समानतेसाठी ही गंभीर बाब बनली आहे. स्थानिक नेतृत्वाने तातडीने याबाबत कृती करत गावात स्वच्छता राखणे, दुष्परिणाम टाळण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याचा महत्त्वाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. ग्रामपंचायतनेच आपलं उत्तरदायित्व बजावत त्वरित गटार सफाई सुरू करावी आणि लोकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विशेष विचार करावा ही गरज त्यांच्या पुढे आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!