Homeताज्या बातम्यारावेर पंचायत समिती ISO 9001:2015 मानांकन गुणवत्ता धोरण – फक्त कागदावर की...

रावेर पंचायत समिती ISO 9001:2015 मानांकन गुणवत्ता धोरण – फक्त कागदावर की प्रत्यक्षात ?

रावेर दि .28 (प्रतिनिधी ) रावेर पंचायत समिती ISO 9001:2015 मानांकन प्राप्त करून नागरिकांना तत्पर, सुसंगत व पारदर्शक सेवा देण्याच्या कटिबद्धता , गुणवत्ता धोरणामध्ये कार्यालयीन प्रक्रिया सुधारणा, तक्रारींवर त्वरित प्रतिसाद, पारदर्शकता, तसेच कर्मचारी प्रशिक्षण यावर भर देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात या धोरणाच्या अंमलबजावणी फक्त कागदावरच होत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

ISO 9001:2015 मानांकन आणि गुणवत्ता धोरणाची व्याप्ती

रावेर पंचायत समितीने गुणवत्ता धोरणामध्ये नागरिकांना उच्च दर्जाची सेवा देणे, तक्रारी संवेदनशीलतेने पाहणे, पारदर्शकता राखणे आणि कर्मचाऱ्यांचे विकास सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. कार्यालयीन नोंदी, दस्तऐवज व कामकाज प्रक्रियेमध्ये विश्वासार्हता हा या धोरणाचा पाया आहे. तसेच, सतत प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांद्वारे कर्मचारी कौशल्य वाढवणे आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे अपेक्षित आहे. या सर्व बाबी ISO 9001:2015 मानांकनाच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.

नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनातील विरोधाभास….

तरीही, अनेक नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत की रावेर पंचायत समितीतील सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी नियमाप्रमाणे काम करत नाहीत. सचिव आणि गटविकास अधिकारीही या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप आहेत. हे प्रशासनात पारदर्शकतेचा अभाव आणि गुणवत्ता धोरणाच्या अंमलबजावणीतील अकार्यक्षमता दिसुन येत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष लक्ष आवश्यक….

ISO मानांकना नंतर ही नागरिकांच्या अडचणी सुटत नसल्याने मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे. प्रशासनातील त्रुटी दूर करत नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तत्परपणे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

गुणवत्ता धोरण हे फक्त कागदावर थांबले की काय ?

गुणवत्तेचा सातत्यपूर्ण उच्च दर्जा राखताना प्रशासनाच्या पारदर्शकता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम साधणे ही रावेर पंचायत समितीची खरी खरी गरज आहे. एखाद्या ISO 9001:2015 मानांकनाचा फायदा फक्त कागदावर नसून तिची खरी परीक्षा प्रत्यक्ष सेवा प्रणालीत दिसायला हवी. प्रशासनाची गुणवत्ता वाढली तर जनतेचा विश्वास अधिकच प्रगाढ़ होतो. म्हणून “प्रशासनाची गुणवत्ता हीच जनतेचा विश्वास” या घोषणेला खरीखुरी रूपात साकार करणे हेच प्राथमिक उद्दिष्ट असेल तरच रावेर पंचायत समितीच्या ISO 9001:2015 मानांकनाचा खरा फायदा होईल.

रावेर पंचायत समितीतील ISO मानांकन योग्य ते अंमलात आणून प्रशासनातील कमतरता दूर होण्यासाठी तत्परतेची गरज आहे. नागरिकांच्या विश्वासाला बळकटी देण्यासाठी गुणवत्ता धोरण फक्त कागदावर न राहता वास्तविक सेवेत दिसणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!