Homeताज्या बातम्यारसलपुर-बक्षीपुर ग्रामपंचायतींच्या गैरकारभाराची चौकशी अजूनही 'थंडबस्त्यात'... तक्रारींना महिने उलटले; विस्तार अधिकाऱ्यांवर...

रसलपुर-बक्षीपुर ग्रामपंचायतींच्या गैरकारभाराची चौकशी अजूनही ‘थंडबस्त्यात’… तक्रारींना महिने उलटले; विस्तार अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण सांगत चौकशी रखडली ISO नामांकित पंचायत समितीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल

रावेर दि . 12 ( प्रतिनिधी ) रसलपुर व बक्षीपुर ग्रामपंचायतींमधील कथित गैरकारभार व आर्थिक अनियमिततांबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी अजूनही थंडबस्त्यातच पडून असल्याचे चित्र समोर आले आहे. तक्रारी दाखल होऊन बराच कालावधी लोटला असतानाही पंचायत समिती प्रशासनाकडून कोणतीही ठोस चौकशी सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता, विकासकामांतील कथित गैरव्यवहार तसेच निधी वापराबाबत प्रश्न उपस्थित करत पंचायत समितीकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र, तक्रार व प्राथमिक चौकशी देखील सुरू नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे .

दरम्यान, ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे विविध योजना, प्रशासकीय कामे तसेच बैठकींचा मोठा ताण असल्याने चौकशी प्रक्रियेला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असूनही चौकशी न होणे ही बाब नागरिकांमध्ये संशय निर्माण करणारी ठरत आहे.

विशेष म्हणजे संबंधित पंचायत समितीला ISO नामांकन मिळाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात लोकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने “ISO फक्त नावालाच करीत आहेत. पारदर्शकताची टीका ही नागरिकांकडून का?” असा प्रश्न ग्रामस्थ उर्ण व उत्तरदायित्वाचा अभाव केली जात आहे.

ग्रामस्थांचा थेट आरोप

तक्रारी करून ही चौकशी होत नसल्याने प्रशासन गैरकारभार झाकण्याचा प्रयत्न करत आहे का, असा संशय निर्माण झाला आहे. पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून सत्य बाहेर आणावे.” – ग्रामस्थ

जनतेच्या मनात निर्माण झालेले  प्रश्न..

तक्रारींवर अद्याप चौकशी का सुरू झाली नाही?विस्तार अधिकाऱ्यांवरील कामाचा ताणच एकमेव कारण आहे का?ISO नामांकन असूनही नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का ?

आंदोलनाचा इशारा

रसलपुर व बक्षीपुर ग्रामपंचायतींमधील गैरकारभाराच्या तक्रारींची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...

error: Content is protected !!