Homeताज्या बातम्यामोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या - आनंदभाऊ...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची मागणी

पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून, त्याला तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षने, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ खरे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे लाख तांडा (ता. पाचोरा) येथील अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपी किशन प्रकाश बेलदार याने 16 मार्च 2026 रोजी घरात घुसून तिच्याशी अश्लील वर्तन करत जबरदस्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरडा केल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

या प्रकरणी 17 मार्च 2026 रोजी पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा 2012 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तथापि, गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही आरोपी अद्याप अटकेपासून दूर आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात असून, राजकीय पाठबळामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे पीडित मुलगी व तिच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, आरोपीला तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी आयु. आनंदभाऊ खरे यांनी उपविभागीय अधिकारी, वसमत यांच्या मार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...

निकृष्ट बांधकामामुळे अटवाडे पशुवैद्यकीय दवाखाना वादात… कामाचा फलक नाही, इस्टीमेट माहिती नाही; काम...

0
रावेर दि .24 (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील अटवाडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या कामास...

error: Content is protected !!