Homeताज्या बातम्यामुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज दादा बनसोडे यांच्या सूचनेनुसार रिपब्लिकन कामगार सेना राज्य कमिटीच्या वतीने मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व समाज कल्याण मंत्री यांच्या कार्यालयात भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील लाख तांडा येथे मागासवर्गीय समाजावर झालेल्या अन्याय प्रकरणी संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक करून अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

समाज कल्याण मंत्र्यांच्या कार्यालयात निवेदन देताना रिपब्लिकन कामगार सेना राज्य समन्वयक विक्रम भाई खरे, उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष हनुमंत वाघमारे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजू दादा दोंदे, कोकण प्रदेश प्रमुख संघटक आकाश भाई गायकवाड व इतर सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर प्रकरणात शासनाने तातडीने लक्ष घालून अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...

निकृष्ट बांधकामामुळे अटवाडे पशुवैद्यकीय दवाखाना वादात… कामाचा फलक नाही, इस्टीमेट माहिती नाही; काम...

0
रावेर दि .24 (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील अटवाडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या कामास...

error: Content is protected !!