Homeताज्या बातम्याबारामती-निरा रस्त्यावर मृत्यूचा खेळ – एस.टी. बसने उडवली दुचाकी एस.टी. बसच्या धडकेत...

बारामती-निरा रस्त्यावर मृत्यूचा खेळ – एस.टी. बसने उडवली दुचाकी एस.टी. बसच्या धडकेत पित्याचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

बारामती दि .30 (प्रतिनिधी) माळेगाव बु।। ता. बारामती जि. पुणे येथे शारदानगर बारामती-निरा रोडवरील पुलाजवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर एस.टी. बसचालक घटनास्थळावरून पसार झाला.

दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.45 च्या सुमारास फिर्यादी योगेशकुमार राजेंद्र भागवत (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) यांचे वडील राजेंद्र दिनकर भागवत हे मुलगी स्वरा हिला घेऊन दुचाकी (क्र. एम.एच.11 बी.क्यु. 8941) वरून रस्ता क्रॉस करीत होते. त्यावेळी बारामतीकडून निराकडे जाणारी एस.टी. बस (क्र. एम.एच.14 बी.टी. 4790) भरधाव वेगात आली. चालक सचिन प्रल्हाद पवार (वय 39, रा. हिंगणेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) याने निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात राजेंद्र दिनकर भागवत यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी स्वरा गंभीर जखमी झाली. दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून निघून गेला.

या प्रकरणी माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 227/2025 अंतर्गत बी.एन.एस. कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहवा सादिक सय्यद (ब नं. 2213) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!