Homeताज्या बातम्यानिकृष्ट बांधकामामुळे अटवाडे पशुवैद्यकीय दवाखाना वादात... कामाचा फलक नाही, इस्टीमेट माहिती...

निकृष्ट बांधकामामुळे अटवाडे पशुवैद्यकीय दवाखाना वादात… कामाचा फलक नाही, इस्टीमेट माहिती नाही; काम तात्काळ थांबविण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार……

रावेर दि .24 (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील अटवाडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या कामास तात्काळ स्थगिती देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ भाऊराव करवले यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. या प्रकरणामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटवाडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम सध्या लॅटर लेव्हलपर्यंत पूर्ण झाले असून स्लॅब टाकण्याचे काम बाकी आहे. मात्र या कामासाठी शासनाकडून किती निधी मंजूर झाला, काम पूर्ण करण्याची मुदत किती आहे, तसेच मंजूर अंदाजपत्रकात कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

बांधकामाच्या ठिकाणी कामाचा माहिती फलक लावलेला नसल्यामुळे कामाची रक्कम, ठेकेदाराचे नाव, कामाची मुदत, मंजूर निधी याबाबत ग्रामस्थांना कोणती ही माहिती मिळत नाही. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट, वाळू, गिट्टी व इतर साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. साहित्य तपासणी अहवाल मागितला असता ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या बाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही. ISO नामांकन प्राप्त पंचायत समितीत तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे सदर बांधकामाची तात्काळ चौकशी करून काम थांबविण्यात यावे, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी व कामाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे अटवाडे परिसरात चर्चा सुरू असून प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...

error: Content is protected !!