Homeताज्या बातम्यातिडके पाटील विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

तिडके पाटील विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

कोपरगाव दि .29 तालुका प्रतिनिधि ( नवनाथ उल्हारे ) चासनळी – रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चासनळी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान क्रीडा विभाग प्रमुख कोल्हे एम.एन. यांनी स्वीकारले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती तर वाढतेच, पण मानसिक सबलता, संघभावना, नेतृत्वगुण व आत्मविश्वास देखील वृद्धिंगत होतो.”

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक दवंगे एस.यू. होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व पटवून दिले. “भारताचे हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी खेळाडूप्रमाणे शिस्तबद्ध जीवन जगावे व खेळातून जीवनमूल्ये शिकावीत,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. कुशारे डी.एन. यांनी प्रभावीपणे केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शाळेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कबड्डी, खो-खो, धावण्याच्या शर्यती, गोळाफेक, रस्सीखेच यांसारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. मोरे आर.के. सारबंदे एन. एच, शेख आर. एन, कुशारे डी.एन.निळकंठ पी.ए. राऊत एस. एल, माळी ए.पी.गोडे एस. एम, बागुल जी. एम, थोरात के. जी, सोनवणे एस. व्ही. गुंजाळ बी.व्ही. कदम एन.आर. चौधरी एच. एस. भुजबळ पी.एच. गोपाळे एस. के. कापडणीस एच.डी. लांडगे व्ही.जे. पवार आर.बी. सोनवणे मॅडम, मोहन जाधव, पवार एस. एस. मंडलिक एस.टी. कापसे के.डी. यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!