यावल दि .29 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) जळगाव येथील कांताई हॉल येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत इकरा पब्लिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कॅरम या खेळात उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा लौकिक वाढविला.

स्पर्धेत दमदार खेळ करून चौघा विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले. निवड झालेल्या खेळाडू बिलाल शेख शेरु (अंडर-१७) सईजान खान (अंडर-१७) मुजम्मील शेख आरीफ (अंडर-१७)शेख अबूजर जलाल (अंडर-१४)या कामगिरीमुळे इकरा पब्लिक हायस्कूलने तालुक्यातील कॅरम स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, जनरल सेक्रेटरी एजाज मलिक व मुख्याध्यापक शेख शकील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक आमीर खान यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
























