रावेर दि .१९ (प्रतिनिधी ) रावेर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त कार्यकारणी तयार करण्यासाठी आणि शहरात व्यापक जयंती कार्यक्रम आयोजित करण्याच्या उद्देशाने ठोस पाउल उचलण्यात आले आहे. तक्षशिला बुद्ध विहार येथे दि . १९ रोजी आयोजित बैठकीत भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, रावेर शहर यांची निवड करण्यात आली आणि सन २०२६ साठी कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.
बैठकीत प्रमुख विषयांवर चर्चा झाली आणि समाजातील विविध स्तरातील नेते, व्यायाम शाळा व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रावेरमध्ये स्थापन झालेल्या या समितीचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे कार्यक्रम सुव्यवस्थितरीतीने, समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करून साजरे करणे असे आहे.

एकमताने निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे:
अध्यक्षः जगदीश घेटे, उपाध्यक्षः बाळू शिरतुरे
सचिवः संघरत्न दामोदरे ,सहसचिवः राजेंद्र अटकाळे
कोषाध्यक्षः दिपक नगरे, सहकोषाध्यक्षः प्रकाश महाले
सदस्यः दिलीप कांबळे, विकास अवसरमल, ॲड . योगेश गजरे, ॲड. दिपक तायडे, पंकज वाघ
बैठकीत नगरसेवक पिंटू वाघ, संघरक्षक तायडे, मेघराज शेगावकर, रुपेश गाढे, विकास अटकाळे, अमोल तायडे, संकित तायडे, अजय तायडे, सुनिल शिरतुरे, सम्यक इंगळे, राजू गजरे, अक्षय मशाने, विनोद शिरतुरे, विशाल तायडे, निलेश तायडे, विनोद दामोदरे, शुभम घेटे, रमण गजरे, रविंद्र तायडे, करण मोरे, लखन मोरे, प्रथमेश गजरे, करण घेते यांच्यासह बरीच सामाजिक व सांस्कृतिक व्यक्ती उपस्थित होत्या. तसेच भिमगर्जना व्यायाम शाळा, सिद्धार्थ व्यायाम शाळा, सिद्धार्थ, फुले, आंबेडकर व्यायाम शाळा, भिमशक्ती मित्र मंडळ, रमाई मित्र मंडळ, प्रशिक व्यायाम शाळा, तथागत व्यायाम शाळांचे सदस्य व शेकडो समाज बांधव उपस्थित होते .
बैठकीत समितीच्या पुढील कामकाजावर सकारात्मक चर्चा करण्यात आली . जयंतीच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, सार्वजनिक व्याख्यान, स्मरण-सभा व समाजसचेतना मोहीम तसेच स्थानिक स्तरावर सहभाग वाढवण्यासाठीच्या कार्ययोजना यावर चर्चा करण्यात आली. सर्व उपस्थितांनी समाजातील युवा पिढीचे जागृतीकरण व एकात्मता वाढविण्याबाबत आपला मनोबल दर्शविला.
रावेर मध्ये निवड झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती ही स्थानिक पातळीवर सामाजिक समता, शैक्षणिक प्रबोधन व सांस्कृतिक गौरवाचे धोरण राबविण्यासाठी महत्त्वाची दिशा ठरेल, अशी समुदायाची अपेक्षा आहे. आगामी काळात ही कार्यकारिणी ठोस कार्यक्रम तयार करून जयंती साजरी करण्यास पुढे येईल. सर्व समाज बांधवांना आणि संबंधित संस्थांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.






















