Homeक्राईम५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांनी पकडलं! मुंबईतील...

५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांनी पकडलं! मुंबईतील ड्रग्स प्रकरणातील आरोपीला बारामतीतून बेड्या — पोलिसांची अत्यंत गुप्त कारवाई यशस्वी

बारामती दि.२५ (प्रतिनिधी ) बारामती तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलीस ठाणे (नालासोपारा पूर्व), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय हद्दीत १४ सप्टेंबर रोजी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपींमध्ये शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय २०, रा. वसई) यांचा समावेश होता.

यापैकी समीर शेख हा फरार होता. तो बारामतीत असल्याची माहिती वसई-विरार पोलिसांकडून बारामती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून, आरोपी ‘ब्रँड रिव्हर’ या कपड्याच्या दुकानात काम करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, हुशारीने आखलेल्या योजनेतून त्याला अटक केली.

चौकशीत आरोपीने तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याची कबुली दिली. त्यानंतर वसई-विरार आयुक्तालयाच्या पोलिसांना माहिती देऊन आरोपीस पुढील तपासासाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स.पो.नि. विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे आणि पोलीस अंमलदार निलेश वाकळे, राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.

आरोपीस तुळींज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राख, हवालदार कांबळे आणि कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!