मुक्ताईनगर दि .9 (प्रतिनिधी ) शाळा ही विद्यार्थ्यांना घडविणारी यंत्रणा आहे. माजी विद्यार्थ्यांच्या अश्या स्नेसंमेलनातून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त होते,असे प्रतीपादन प्रसिद्ध साहित्यिक दीपध्वज कोसोदे यांनी केले.ते रुईखेडा येथील मंजाबाई नारखेडे विद्यालयाच्या स्नेसंमेलनात बोलत होते.
अध्यक्षस्थानी चेअरमन चंद्रशेखर बढे होते.तर माजी मुख्याध्यापक बढे, धांडे,एन.आर.चव्हाण, शशिकांत सोनवणे,दीपध्वज कोसोदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोसोदे यांनी बोलतांना पुढे सांगितले की,अलीकडे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे संवादाची प्रक्रिया बंद झाली आहे.अश्या वातावरणात असा कार्यक्रम होतो,ही मोठी गोष्ट आहे.
नारखेडे विद्यालयाच्या १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राजेंद्र कुलकर्णी,रमजान वंजारी,मिलिंद गुरचळ,कृष्णा कोल्हे, डॉ.योगेश पाटील आणि शुभांगी कोलते यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमातील महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. विशेष म्हणजे माजी विद्यार्थी यांनी आपल्या परिवारासह (नवरा,बायको,मुलांसह) या स्नेसंमेलनाला हजेरी लावली होती.
























