Homeआरोग्यसीईओ मीनल करनवाल व आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून रावेर पंचायत समितीत...

सीईओ मीनल करनवाल व आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून रावेर पंचायत समितीत पोषण माह उत्सव

रावेर दि 4 ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पोषण अभियान धोरणानुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच रावेर पंचायत समितीत पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने अंगणवाडी सेविकांनी मुलांच्या दृष्टीने पौष्टिक व चवदार अशा विविध रेसिपी तयार करून सादर केल्या. मुलांना संतुलित व पोषक आहार मिळावा, तसेच मातांमध्ये आहाराविषयी जागरूकता वाढावी हा मुख्य उद्देश होता.

आहार प्रदर्शनामध्ये ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूरक पोषण आहार “प्रोटो विटा” तसेच गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या आहार प्रदर्शनाला आमदार अमोल जावळे आणि मीनल करनवाल यांनी भेट देत पाहणी केली.

याशिवाय या रेसिपींना अधिक व्यापक पोहोच मिळावी म्हणून महिनाभरासाठी ३० व्हिडिओ तयार करण्यात येणार असून ते आई व महिलांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक आईला घरी सहज करता येणाऱ्या पौष्टिक व आरोग्यदायी रेसिपींची माहिती मिळणार आहे.

 या उपक्रमामुळे बालकांच्या आरोग्य, पोषण व सर्वांगीण विकासाबरोबरच आई-मातांना मार्गदर्शन मिळून समाजात पोषणमय जीवनशैली रुजविण्यास मोठी मदत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!