विवरे ॥ खु ॥ प्रतिनिधी ( जमील शेख ) दि . 16 रावेर तालुक्यातील सावदा येथे मुस्लिम समाजाच्या एक आदर्श विवाहाचे सुंदर दृष्य आज १६ तारखेला पाहायला मिळाली. शेख इरफान शेख लुकमान यांची कन्या महेक बी आणि विवरे येथील असलम खान रशिद खान यांच्या मुलगा अजीम खान यांचा विवाह इस्लामीक रितीरिवाजाने आणि एक अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुडयातच संपन्न झाला. हा विवाह मुस्लिम समाजात नव्या आदर्शाची सुरुवात म्हणून पाहिला जात आहे.
साखरपुडयातच लग्न करणे ही एक अनोखी बाब होती ज्याचा सन्मान दोन्ही कुटुंबीयांनी केला. विवरे येथून आलेले असलम खान आणि त्यांचे नातेवाईक साखरपुडया साठी सावदा येथे पोहोचले होते. त्या दरम्यान, दोन्ही नातेवाईकांनी असा निर्णय घेतला की हा विवाह साखरपुडयातच साध्या पद्धतीने पार पडावा. परिणामी, देखावा पेक्षा साधेपणाला प्राधान्य देऊन हा विवाह अतिशय साध्या व आदर्श पद्धतीने पार पडला.
सावदा येथील हा विवाह इस्लामीक रितीरिवाज व प्रथांना जपणारा असल्याने मुस्लिम समाजात या प्रकाराला विशेष कौतुक होत आहे. हा विवाह सामाजिक संस्कृतीच्या जपणुकीचा दर्जा वाढवणारा म्हणून समजला जात आहे.
या विवाह सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. हाजी तुराब खान (यावल), शेख कुर्बान मेंबर (फैजपुर), सय्यद अजगर दादा (सावदा), शेख अनवर, शेख अकबर व शेख निसार सर (विवरा), इसराईल खान, युसुफ खान, व शेख अजगर (शाहापुर) यांसारखे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या विवाह सोहळ्याला अधिकच भारावून टाकणारा आनंद लाभला.
सावदा येथील हा मुस्लिम विवाह आदर्श म्हणून नोंदवला गेला असून, साखरपुडयातच साध्या पद्धतीने लग्न करण्याचा नवा ट्रेंड मुस्लिम समाजात राबवण्याचा संदेश देतो. या प्रकाराने विवाह सोहळ्यांतून खर्चिकता कमी करणे ही एक सकारात्मक बाब समोर आली आहे. शेख इरफान आणि असलम खान यांच्या कुटुंबीयांनी साधेपणा आणि इस्लामीक परंपरांचा समन्वय साधून केलेल्या या विवाहाचा मुस्लिम समाजात टक्का बदल होण्याची अपेक्षा आहे.
























