Homeसामाजिकसाकळी येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी

साकळी येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील साकळी येथील श्री संत सावता महाराज बहुउद्देशीय संस्था तसेच समस्त माळी समाज बांधव यांच्या वतीने श्री संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा दि.२३ जुलै २०२५ रोजी श्री संत सावता महाराज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक तसेच समाजपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.दरवर्षी हा उत्सव सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी माळी समाजातील एका नवविवाहित जोडप्याच्या हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली.यानंतर माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील,जळगाव जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती रविंद्र पाटील,साकळीचे सरपंच दिपक पाटील वढोद्याचे सरपंच संदीपभैय्या सोनवणे,भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉ.सुनिल पाटील,ज्येष्ठ व्यक्तिमत्व रमेश महाजन,माजी ग्रा.पं.सदस्य साहेबराव बडगुजर,यावल पं.स. माजी सभापती दिपक अण्णा पाटील,मोहसीन खान यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे विशेष व अतिशय गौरवाची बाब म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या संकेत रामकृष्ण माळी याच्यासह अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सदर कार्यक्रमात मान्यवरांचे असते यथोचित गौरव करण्यात आला.कार्यक्रमात अनेकांची मनोगत झाली.आपल्या गावातील माळी समाजातील काही जण आपल्या स्वकर्तुत्वाने गावाचे व समाजाचे नाव उंचावित आहे याचाही उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सुभाष महाजन यांनी तर आभार प्रदर्शन दिनकर माळी यांनी केले.यानंतर गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते.या कार्यक्रमा दरम्यान गावातील व परिसरातील अनेक पदाधिकाऱ्यांसह जेडीसीसी बँकेचे माजी संचालक गणेशदादा नेहेते यांनी सदिच्छा भेट दिली.
यानंतर सायंकाळी अतिशय मंगलमय वातावरणात संत सावता महाराजांच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भजनी मंडळ मिरवणुकीची शोभा वाढवित होते.या मिरवणुकीत गावातील समस्त माळी समाजातील महिला-पुरुष तसेच युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते.संपूर्ण उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुभाष महाजन, उपाध्यक्ष दिनकर माळी यांचे सह मंडळाचे सर्व संचालक तसेच समस्त माळीसमाज बांधवांनी परिश्रम घेतले.सदरील श्री संत सावता महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा हा गावाचा प्रमुख उत्सव सोहळा म्हणून मानला जातो .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!