Homeताज्या बातम्यासाकळी येथे दिवंगत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण सरपंच यांचा इतिहासात नोंद...

साकळी येथे दिवंगत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण सरपंच यांचा इतिहासात नोंद होईल असा कौतुकास्पद निर्णय

यावल दि .15 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र आणि राष्ट्रीय अभिमानाच्या दिवशी तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने एक अनोखी आणि इतिहासात नोंद होईल अशी कामगिरी केली. गावातील दिवंगत पाणीपुरवठा कर्मचारी बुद्धवासी चिंतामण टोपलू सुरवाडे यांच्या पत्नी सौ. बेबाबाई चिंतामण सुरवाडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करून लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोठे मन दाखवले.

या अनोख्या उपक्रमामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात साकळी ग्रामपंचायतीचे नाव आदराने घेतले जाईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. १५ ऑगस्ट रोजी ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या ध्वजारोहण सोहळ्यास गावातील नागरिक, आजी-माजी पदाधिकारी, विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी, समाजसेवक तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत चिंतामण सुरवाडे यांनी ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागात अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. त्यांच्या अचानक निधनानंतर ग्रामपंचायतीने त्यांच्या कुटुंबाच्या भावनांचा आदर ठेवत, पत्नी सौ. बेबाबाई यांना या सन्मानासाठी आमंत्रित केले. हा निर्णय गावात सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.

ध्वजारोहणानंतर सरपंच दिपक पाटील यांनी भाषणात सांगितले की, “ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान अनमोल असते. त्यांच्या कुटुंबीयांना आदर आणि मान देणे ही आमची जबाबदारी आहे. या ध्वजारोहणातून आम्ही त्यांचे स्मरण आणि सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे.”

सोहळ्यानंतर राष्ट्रगीत गाऊन सर्वांनी देशभक्तीपर गीतांचा आस्वाद घेतला. यावेळी शालेय मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण देशभक्तीमय झाले.

ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी या ऐतिहासिक उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. साकळी ग्रामपंचायतीचा हा निर्णय पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!