यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे) यावल तालुक्यातील साकळी या गावाला लोकमत कडुन जिल्हातील उत्कृष्ट सरपंच पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला यात साकळी येथिल सरपंच दिपक नागो पाटील यांची जिल्हातून उत्कृष्ट सरपंच म्हणुन निवड करण्यात येऊन त्यांना सन्मानित केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष युनुस मन्सूरी यांनी अध्यक्षीय विचार माडतांना साकळी येथिल तरुणांना संदेश देत तरुणांनी चांगल्या कामात नेहमी सहभाग घेऊन गावाचे नाव उच्च स्तरावर न्यावे ज्या प्रमाणे सरपंच दिपक पाटील यांच्यां कार्यातून साकळी गावाला पुरस्काराने सन्मानित केले.
लोकमत कडुन जळगांव जिल्हातील ग्रामपंचायतिचा सर्वे करण्यात आला होता सर्वेतून जळगांव जिल्हातील एकुण 13 गावांची निवड करण्यात आली होती. त्यात साकळी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असतांना सुद्धा मोठ्या प्रमाणात सरपंच दिपक नागो पाटील यांनी विविध माध्यमातून निधी आणून गावाचा काही महिन्यातच गावात जोमाने विकास कामांना सुरुवात केली. आणि उत्कृष्ट असेल काम करून साकळी गावात नववधू योजना सुरु करून गावात येणारी सुन आणि गावातून बाहेर जाणारी लाडकी यांना आहेर स्वरूपात प्रेशर कुक देऊन नववधू यांचा सन्मान केल्या जाण्याची योजना राबवात विविध योजना साकळी गावात सुरु केल्या आहेत. त्यांच्या या विकासात्मक कामाची दाखल घेत लोकमत मंच यांच्या कडुन साकळी येथिल लोकनियुक सरपंच दिपक पाटील यांचा व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान करण्यात आला होता त्याचे औचित्य साधुन गावातील तंटामुक्ती समिती मार्फत सरपंच दिपक पाटील व सर्व ग्रामपंचायत यांनी गावात केलेल्या विकासाची पावती म्हणुन जिल्हास्तरावर साकळी गावाचे नाव लौकिक केले असल्याचे साकळी गावाचा मानसन्मान वाढवीला त्यामुळे लोकनियुक्त सरपंच यांचा साकळी गावातील तंटामुक्ती समिती मार्फत सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष युनुस मन्सूरी हे होते तर कार्यक्रमांस माजी आरोग्य सभापती जि. प. जळगांव रविंद्र सूर्यभान पाटील,विविध कार्यकरी सोसायटी सदस्य सुभाष नाना महाजन, सुनिल नेवे,न्याजोद्दीन शेख, दिनकर माळी,ग्रामपंचायत सदस्य खतीब तडवी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजु सोनवणे, माजी उपसरपंच फखरुद्दीन कुरेशी,ग्रामपंचायत सदस्य मुकेश बोरसे, सामाजिक कार्यकर्ता कय्युम शेख,माजी ग्रामपंचायत सदस्य जहांगीर कुरेशी,ग्रामपंचायत सदस्य विनोद खेवलकर,शेख सलीम शेख मजीद, ग्रामपंचायत सदस्य अकबर शेख, नरेंद्र मराठे,उमेश बडगुजर, अन्वर शेख, वाय. जी. नेवे, साहेबराव बडगुजर, नाना भालेराव, राजु पिंजारी, एकबाल पिंजारी, सर्फराज तडवी,मुकेश खेवलकर,यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक, सर्व साकळी येथिल तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्ती समितीचे सचिव आप्पा खेवलकर यांनी केले.तर अनेकांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष युनुस मन्सूरी यांनी छान असेल मनोगत व्यक्त करतांना साकळी येथिल तरुणांनी चांगल्या विचार धारेशी जुडून साकळी गावाचे नाव आणखी मोठ्या प्रमाणात लौकिक व्हावे यासाठी तरुण वर्गाने चांगले कामे करून साकळी गावाचे नाव उच्चस्थानी न्यावे. चांगल्या कामाची पावती ही नेहमी मिळत असते वाईट कामाची पावती कधीच मिळत नसते आणि साकळी गावाची जी विकासाची मुसंडी आहे. ती अश्याच प्रकारे चालत राहो त्याच प्रमाणे साकळी गावाची एकता व अखंडता अशीच काम राहो असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना तरुणांना संदेश दिला आहे. त्यांच्या या मनोगताने उपस्थिस्थानाचे मने जिकंली.





















