यावल दि . 6 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) ५ सप्टेंबर २०२५ रोजी अंजुमन ए इस्लाम उर्दू शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते दरवर्षी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी समर्पित आहे या तारखेला हा दिवस साजरा करण्याचे स्वतःचे महत्त्व आहे वास्तविक हा दिवस विशेषतः डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो ज्यांच्या जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तीरुत्तनी ग्राम येथे झाला होता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सोबतच एक महान विद्वान, तत्त्वज्ञानी आणि भारत रत्न प्राप्त करणारे होते
शिक्षक दिनाच्या इतिहास
१९६२ साली जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी ५ सप्टेंबर हा विशेष दिवस साजरा करण्याची परवानगी मागितली तेव्हा राधाकृष्णन म्हणाले माझ्या वाढदिवस साजरा करण्या ऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल म्हणूनच त्यांच्या इच्छेनुसार १९६२ मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यातील ४०वर्ष शिक्षक म्हणून देशासाठी वाहून घेतले शिक्षकांच्या आदर करणारा वर त्यांनी नेहमीच भर दिला समाजाला योग्य दिशा देण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो असे त्यांची धारणा होती खरा गुरु आपल्या शिष्याला प्रतिकूल परिस्थितीच्या सामना करायला शिकवतो आणि त्यांच्या जीवन सुधारण्यात योगदान करतो असे त्यांचे विचार होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य मोहम्मद इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
























