Homeताज्या बातम्यासाकळी गावाच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांगांना किराणा किटचे वाटप सरपंच दिपक पाटील...

साकळी गावाच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांगांना किराणा किटचे वाटप सरपंच दिपक पाटील यांची संकल्पना

यावल दि .21 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) स्वातंत्र्य दिनानिमित्त साकळी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच गावातील दिव्यांग बांधवांसाठी अनोखी योजना राबविण्यात आली. लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या संकल्पने नुसार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी गावातील सुमारे ६० दिव्यांग बंधू-भगिनींना मोफत किराणा किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच दिपक पाटील यांनी भूषविले होते. व्यासपीठावर उपसरपंच नूरबी तस्लीमखान, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध आजी-माजी पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सरपंच दिपक पाटील म्हणाले, “दिव्यांग बांधवांना समाजात सन्मानाने व सुसह्यपणे जगता यावे, यासाठी हा प्रयत्न आहे. पुढे शासनाकडून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना येतील त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

दिव्यांग बांधवांच्या वतीने वासुदेव बडगुजर यांनी कृतज्ञता व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नेवे यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली यांनी केले.

भावनिक आणि संवेदनशील अशा या उपक्रमास गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!