Homeताज्या बातम्याविरोदा-रिधुरी रस्त्याचे स्वप्न आमदार अमोलभाऊ जावळेंच्या पुढाकारातून साकारणार ...लाडक्या बहिणींच्या हस्ते भूमिपूजन

विरोदा-रिधुरी रस्त्याचे स्वप्न आमदार अमोलभाऊ जावळेंच्या पुढाकारातून साकारणार …लाडक्या बहिणींच्या हस्ते भूमिपूजन

यावल दि . 27 (प्रतिनिधी ) रावेर मतदारसंघातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विरोदा ते रिधुरी रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन नुकतेच परिसरातील लाडक्या भगिनींच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विकासकामामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या रस्त्यामुळे विरोदा, रिधुरी आणि परिसरातील इतर गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून, शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सुकर मार्ग मिळेल. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला गती येईल आणि आपत्कालीन सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचू शकणार आहे.

या कार्यक्रमात बोलताना आमदार अमोलभाऊ जावळे म्हणाले, “हा केवळ रस्त्याचा विकास नसून, रावेर मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीची सुरुवात आहे. मायबाप जनतेने भरभरून दिलेला पाठिंबा, विश्वास, आणि प्रेम — याचे उत्तर विकासकामांच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२४ व प्रेरणादायी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला. 

या रस्त्यासाठी निधी मंजूर करून काम सुरू करण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असून, यामुळे स्थानिक पातळीवर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला शरद महाजन, नारायण चौधरी, आर. जे. पाटील, सचिन पाटील, भरत महाजन, गणेश नेहते, नरेंद्र नारखेडे, उमेश पाटील, जयश्री चौधरी, उमेश बेंडाळे, सागर कोळी, पिंटू तेली, डॉ. नरेंद्र कोल्हे, चिंतन जैन, भरत पाटील, किशोर पाटील, मछिंद्र चौधरी, जीवन तायडे, विनोद झाल्टे, पंकज बऱ्हाटे, पूनम चौधरी, मीना बाई बऱ्हाटे, देवयानी चौधरी, तिलोत्तमा चौधरी, रूपाली सोनवणे, अमोल वारके, सतीश बऱ्हाटे, सतीश चौधरी, वसीम पिंजारी, कमलाकर चौधरी, सुनील चौधरी, रवींद्र खाचणे, योगेश चौधरी, दिलीप चौधरी, चंदू वारके, मुकेश कोळी, लीलाधर चौधरी, प्रकाश कपले, नंदू सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!