यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि 30 यावल तालुक्यातील दि.29 रोजी मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने अनेक शेताकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यावल महसूल विभागाने त्याची दाखल घेत तालूकात झालेल्या वादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्यात सुरुवात केली असुन यावल महसूल सज्ज झाले आहेत.
यावल तालुक्यात दि. 29 रोजी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊसाने हजेरी लावली असता या वादळी वाऱ्यामुळे अनके शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात केळीचे नुकसान झाले असल्याने दि. 30 रोजी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकार यांनी वादळी वाऱ्यात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची दाखल घेत थेठ शेतकऱ्यांनच्या बांदावर जाऊन झालेल्या नुकसानीची प्रत्येक्ष रित्या पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती चे पंचनामे केले असुन महसूल प्रशासनाने वरिष्ठ स्थरावर झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाच्या शेतीचे पंचनामे पाठविले असतांना शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे असे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जाहीर केले असतांना वादळी वारा आणि पाऊसामुळे झालेल्या 29 गावातील 235 शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त पंचनामे करून पंचनामे करण्याचे काम प्रगती पथावर सुरु असल्याने यावल महसूल विभाग सज्ज झालेले दिसुन येत आहे. यावल तालुक्यात झालेल्या वादळी वारा व पाऊसाने नुकसान ग्रस्त भागात पाहणी करतांना यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ, व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
























