Homeक्राईमरिल्ससाठी जाळ-धूर काढणाऱ्या चार बुलेट पोलिसांच्या ताब्यात बारामती तालुका पोलिसांची कडक कारवाई

रिल्ससाठी जाळ-धूर काढणाऱ्या चार बुलेट पोलिसांच्या ताब्यात बारामती तालुका पोलिसांची कडक कारवाई

बारामती दि.१ (प्रतिनिधी ) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार बुलेटस्वारांवर बारामती तालुका पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या तरुणांनी कटफळ पालखी मार्गावरील ब्रिजखाली मोठ्या आवाजात बुलेट चालवत जाळ आणि धूर काढत रेसिंग करत रील्स बनवली होती. ही व्हिडिओ क्लिप दि. २० रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
सदर रील्समध्ये वापरलेल्या बुलेट मोटरसायकलींचे क्रमांक एम.एच ४२ बी एच ७४०४, एम.एच १२ पी एल ७६३७, एम.एच १२ के एम ८५९२, एम.एच ४२ बी.ए ५५५३ असे आहेत.
या चारही मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, संबंधित चालकांविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन, ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने १५ दिवसांसाठी डिटेन करण्यात आली आहेत. शहरात वेगाने वाढणाऱ्या ‘व्हायरल होण्याच्या’ स्पर्धेमुळे युवकांमध्ये रेसिंग, धूर काढणे आणि आवाज वाढवणे या प्रकारात वाढ होत आहे. यामुळे केवळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत नाही, तर वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पेन्सिल चौक, एमआयडीसी परिसर या ठिकाणी कोणीही अतिवेगाने मोठ्या आवाजात वाहने चालविणे अथवा इतर प्रकार करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले मिळून आल्यास तत्काळ कळवावे त्यावर कठोर कारवाई केली जाईल.

~चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस ठाणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!