कोपरगाव दि . 27 प्रतिनिधी (नवनाथ उल्हारे ) दि . 25 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजे दरम्यान दैनिक सार्वमंथन न्यूज चे संपादक अनिल कोळसे यांना कनगर शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोकांना जमावाने मारहाण झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्याकडून माहिती घेत असताना संबंधित तक्रारबाबत माहितीचे चित्रकरण मोबाईलवर करत होते. त्याचवेळी पोलीस शिपाई राहुल यादव यांनी पत्रकार कोळसे यांच्या दिशेने रागा रागा येऊन मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. यावरही न थांबता त्यांनी गलिच्छ शिवीगाळ व धमकीचे सूर लावत अंगावर धावून जात भर पोलीस ठाण्यात गुंडागर्दी केली. या घटनेला पोलीस कर्मचारी सुरज गायकवाड व बाबासाहेब शेळके यांनी अडवून हस्तक्षेप केला तरीही यादव यांचा राग कमी न होता त्यांनी पत्रकार गेला माझ्या… असे शब्द वापरून गुंडागर्दी केली. पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेल्या या प्रकारामुळे पत्रकार संघटना आक्रमक झाली असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने उपलब्ध करून देत यादव या पोलीस कर्मचाऱ्यांना दाखल करून तत्काळ निलंबित करण्याची मागणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन सांगितले. सदर प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी पत्रकारांना आश्वासन दिले. यावेळेस जेष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी संजय कुलकर्णी प्रसाद माईंड गोविंद फुनगे सुनील रासने मनोज साळवे रियाज देशमुख आकाश येवले श्रीकांत जाधव संजय ससाने संपादक अनिल कोळसे शरद पाचारणे ऋषिकेश राऊत सोमनाथ वाघ अशोक मंडलिक आयुब पठाण करणा जाधव सतीश कुलसौंदर दीपक साळवे सागर दोंदे विलास गिरे समर्थ वाकचौरे अधिक पत्रकार उपस्थित होते यावर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास पत्रकार संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यावेळी देण्यात आले .
























